Coronavirus: पीटीआय खासदार शाहीन रजा यांचा कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू; पाकिस्तानमध्ये कोविड 19 विषाणू संक्रमनात वाढ
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-तहरीक-ए इंसाफ (PTI) पक्षाच्या खासदार शाहीन रजा (Shaheen Raza) यांचा कोरोना व्हायरस संक्रमनामुळे मृत्यू झाला आहे. लाहोर येथील मायो रुग्णालयात त्यांचे निधन झाले. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्ताचा हवाला देत वृत्तसंस्था आयएनएसने त्याबाबत वृत्त दिले आहे. शाहीन रजा यांच्यात कोरोना व्हायरस संक्रमन झाल्याची लक्षणे काही दिवसांपूर्वीच दिसत होती. सुरुवातीला रजा यांच्यावर स्थानिक ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार केले जात होते. त्यानंतर त्यांना जिल्हा मुख्यालयातील रुग्णालयतात दाखल करण्यात आले. तिथेही त्यांच्यावरील उपचारांना पुरसे यश आले नाही. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मायो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

उपायुक्त (Deputy Commissioner) सौहैल अशरफ यांनी खासदार शाहीन रजा यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. गेल्या आठवड्यापासून शाहीन यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना व्हेंटीलटरवर ठेवण्यात आले होते. (हेही वाचा, जगभरात कोविड 19 च्या 8 लसींचे क्लिनिकल ट्रायल्स सुरु तर 110 लसी विकासाच्या विविध टप्प्यात- WHO ची दिलासादायक माहिती)

ट्विट

मायो रुग्णालयातील प्रशासनाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, खादार शाहीन रजा यांना तीन दिवसांपू्वी मायो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीपासूनच त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्या मधुमेह आणि रक्तदाब अशा विकारांनही त्रस्त होत्या. त्यांचे पार्थीव शरीर त्यांच्या कुटुंबीयाकडे सोपविण्यात आला आहे.