पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप (Lakshadweep) दौऱ्याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर भारत आणि मालदीवमध्ये तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Maldives President Mohammad Muizzoo) यांनी अप्रत्यक्षपणे भारतावर टिका केली आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे पुन्हा एकदा भारताविरुद्ध बरळले आहेत. चीनमधून परतताच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने १५ मार्च आधी मालदीवमधून सैन्य हटवावे, असं वक्तव्य केलं आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (हेही वाचा - Maldives Association of Tourism Industry On PM Modi: मालदीव्ह टुरिझम बॉडी कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध आक्षेपार्ह विधानाचा निषेध!)
मालदीवच्या मागील सरकारने आग्रह केल्याने भारतानं आपलं सैन्य मालदीवमध्ये रवाना केलं होतं. समुद्री तटांची सुरक्षा आणि आपात्कालीन मदतीसाठी भारताचे सैन्य तैनात केले होते. तत्पूर्वी, मुइज्जू हे शनिवारी चीनच्या दौऱ्यावरून परतून मालदीवमध्ये आले. चीनमधून परतताच मुइज्जू यांनी भारताला डिवचले आहे. 'आमचा देश आकाराने लहान असेल, पण आमच्यावर दादागिरी करण्याचा कोणाचाही अधिकार नाही, असं मुइज्जू म्हणाले.