नमस्ते झालं ग्लोबल! President of France, Emmanuel Macron यांनी नमस्कार करत Chancellor of Germany Angela Merkel यांचं केलं स्वागत! (Watch Video)
Namaste | Photo Credits: Twitter

कोरोना संकटाचा सामना करत आता जगाने पुन्हा न्यू नॉर्मल स्वीकारत आपले व्यवहार सुरू केले आहेत. कोविड 19 चा धोका टाळायचा असेल तर आता सोशल डिस्टन्सिंग पाळणं हाच खबरदारीचा उपाय आहे. त्यामुळे गळाभेट, हाय फाय, हॅन्ड शेकिंग यांना टाळत एकमेकांना भेटण्यासाठी नव्या पर्यायांचा विचार केला जात आहे. भारतीय संस्कृतीमधील 'नमस्ते' आता ग्लोबल झाले आहे. देशा परदेशात अनेकजण आता एकमेकांना ग्रीट करताना नमस्कार करत आहे. नुकताच President of France, Emmanuel Macron हे Chancellor of Germany Angela Merkel यांना एका कार्यक्रमामध्ये ग्रीट करताना नमस्कार करताना दिसले आहे. Coronavirus ने बदलली अभिवादन करण्याची पद्धत, US अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि Ireland पंतप्रधान लियो वराडकर यांनी एकमेकांना केले 'नमस्ते'.  

युरोपामध्ये मार्च महिन्यांत आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये रूग्णांच्या संख्येचा आणि मृत्यूमुखी पडणार्‍यांचा मोठा आकडा पहायला मिळाला होता. सुरूवातीच्या काळात कोरोनामुळे कोलमडलेली आरोग्य यंत्रणा मजबूत करत युरोपात पुन्हा जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र अद्याप कोविड 19 विरूद्ध लस उपलब्ध नसल्याने सारेच सावध राहून, न्यू नॉर्मल स्वीकारत आहेत.

नमस्ते झालं ग्लोबल

भारतीय संस्कृतीमध्ये 'नमस्कार' करण्याची पद्धत आहे. या मुद्रेमधून समोरच्या व्यक्तीच्या प्रति आदर व्यक्त करण्याची भावना प्रकट होते. आबालवृद्ध एकमेकांना भेटताना नमस्कार करूनच हा भाव व्यक्त करतात. आता हीच संस्कृती परदेशातही रूजायला सुरूवात झाली आहे.

कोरोना बाधितांचा जगभरातील आकडा 22,860,184 च्या पार गेला आहे. तर 797,105

जणांचा मृत्यू झाला आहे.