Pope Francis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी लोकशाहीच्या (Democracy) सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि लोकानुनयवादाच्या वाढीविरुद्ध इशारा दिला. ट्रायस्टेच्या एका छोट्या भेटीदरम्यान ते रविवारी (7 जुलै) बोलत होते. पोप 12 दिवसांच्या आशिया दौऱ्यावर (Asia Trip) निघाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी ट्रायस्टेस भेट दिली. त्यांच्या पोपकाळातील सर्वात मोठी भेट मानली जात आहे. पोप फ्रान्सिस यांनी शहराच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका राष्ट्रीय कॅथोलिक कार्यक्रमाचे समारोप करताना ते म्हणाले, "आज जगात लोकशाहीचे आरोग्य चांगले नाही'', असे सांगतानाच त्यांनी वैचारिक प्रलोभन आणि लोकानुनयवाद यांविरुद्ध उपस्थितांना आणि जगाला सावधगिरीचा इशारा दिला.

फ्रान्समध्ये स्नॅप संसदीय मतदानाची दुसरी फेरी पार पडली. ज्यामध्ये अतिउजव्या नॅशनल रॅली (आरएन) पक्षाने आघाडी घेतल्याचा कल पाहायला मिळाला. त्याच दिवशी, पोप फ्रान्सीस यांनी हॅमेलिनच्या पायड पायपरच्या जर्मन परीकथेशी त्याची तुलना केली. "विचारधारा मोहक असतात. काही लोक त्यांची तुलना हॅमेलिनच्या पायड पायपरशी करतात: ते मोहात पाडतात परंतु तुम्हाला ते स्वतःला नाकारण्यास प्रवृत्त करतात," असे ते म्हणाले. गेल्या महिन्यात युरोपियन संसदेच्या निवडणुकांपूर्वी, अनेक देशांतील बिशपांनी देखील लोकानुनयवाद आणि राष्ट्रवादाच्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. इटली, हंगेरी आणि नेदरलँडमध्ये अतिउजव्या पक्षांची सत्ता आधीच आहे, या पार्श्वभूमीवर पोपचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. (हेही वाचा, PM Modi Hugs and Greets Pope Francis: इटलीतील G7 शिखर परिषदेच्या सत्रात पीएम नरेंद्र मोदींनी घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट; भारतात येण्याचे आमंत्रण दिले (See Pics and Video))

जगभारात ध्रुवीकरण सुरु आहे. लोकांना गरीब केले जात आहे. या वृत्तीपासून दूर जाण्याचे अवाहन पोप यांनी केली. त्या वेळी त्यांनी "स्व-संदर्भ शक्ती"वर जोराची टीका केली. एप्रिलमध्ये व्हेनिस आणि मे मध्ये वेरोनाला भेट दिल्यानंतर ही भेट ही त्यांची इटलीमधील तिसरी देशांतर्गत सहल ठरली. अलिकडच्या वर्षांत वाढत्या आरोग्य समस्यांमुळे मर्यादा आलेल्या 87 वर्षीय पोंटिफने सप्टेंबर 2023 मध्ये मार्सेलच्या प्रवासानंतर देशांतर्गत स्थळांपर्यंतचा प्रवास मर्यादित केला आहे. तथापि, ते इंडोनेशिया, सिंगापूर आणि पापुआ बेटांना भेट देणार आहे. सप्टेंबरमध्ये न्यू गिनी आणि पूर्व तिमोर येथे दाखल होण्याची शक्यता आहे.

पोप साधारण सकाळी 9:00 च्या (0600 GMT) आधी ट्रायस्टेला पोहोचले, पोप फ्रान्सिस यांनी धार्मिक आणि शैक्षणिक वर्तुळातील विविध गट तसेच स्थलांतरित आणि अपंग यांची भेट घेतली. दुपारच्या सुमारास व्हॅटिकनला रवाना होण्यापूर्वी शहराच्या मुख्य सार्वजनिक चौकात त्यांच्या भेटीचा समारोप झाला. त्याची ही भेट विविध कारणांसाठी चर्चेत राहिली. त्यांनी आपल्या भेटीदरम्यान विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य करत ताशेरे ओढले.