Nirav Modi (Photo Credits-Twitter)

लंडन (London) येथे 15 महिन्यानंतर पीएनबी (PNB) घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदी (Nirav Modi)  ह्याला अखेर अटक करण्यात आली आहे. तसेच 29 मार्च पर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी नीरव मोदी स्वत:ची ओखळ लपवल्याने अटेकपासून बचाव होईल या हेतूने प्लास्टिक सर्जरी करणार होता असल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून विदेशात फरार झालेला आरोपी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये रस्त्यांवर फिरताना दिसून आला. तसेच भारताकडून ही नीरव मोदी ह्याचा शोध सुरु होता. अखेर नीरव लंडनमध्ये दिसून आला. तसेच ऑस्ट्रेलिया येथून 1750 किमी अंतरावरील वनाटू येथेसुद्धा नीरव मोदी ह्याने नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न केले होते.(हेही वाचा-PNB Scam Case: नीरव मोदी स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? घ्या जाणून)

या बँक घोटाळ्या प्रकरणी नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानुसार मोदी आणि त्याच्या कुटुंबाला नोटीस बजावून तपास यंत्रणेने लंडन येथील कोर्टाकडे त्याच्या अटकेची विनंती केली. त्यामुळे लंडन कोर्टाने या पद्धतीची नोटीस जाहीर करुन अखेर त्याला अटक केली आहे.