PNB Scam: नीरव मोदी याला लंडन पोलिसांकडून अटक;  वेस्टमिंस्टर कोर्टाने काढले होते अटक वॉरंट
Nirav Modi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Nirav Modi arrested in London:  पंजाब नॅशनल बँक घोटाळा ( PNB Scam)  प्रकरणात देशाबाहे पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी ( Nirav Modi) याला पकडण्यात पोलीसांना अखेर यश आले आहे. त्याला लंडन (London )  येथे ताब्यात घेण्यात आले. आज (बुधवार, 20 मार्च 2019) दुपारी 3.30 वाजता त्याला वेस्टमिंस्टर न्यायालयात हजर केले जाणार आहे. या न्यायालयात नीरव मोदी याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या निर्णयाबाबत सुनावणी होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) नीरव मोदी यांची संपत्ती जप्त करुन विकू शकते. वेस्टमिंस्टर कोर्टाने नीरव मोदी याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंड काढले होते. त्यानंतर नीरव मोदी याला कधीही अटक होऊ शकते अशी चर्चा होती. अखेर ही अटक झालीच. (हेही वाचा, PNB Scam: नीरव मोदी विरोधात अटक वॉरंट जाहीर, Westminster Court ची कारवाई)

अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून नीरव मोदी याला अटक करण्याबाबत वॉरंट काढण्यात आले होते. तसेच, नीरव मोदी याला लवकरच स्थानिक पोलीस ( लंडन मेट्रोपॉलिटन पोलीस) अटक करतील अशी शक्यताही अधिकारी वर्तवत होते.