 
                                                                 PNB Scam: पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून विदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) ह्याच्या जामिनाचा अर्ज लंडन कोर्टाने (London Court) दुसऱ्यांदा फेटाळला आहे. या प्रकरणी सुनावणी आता 26 एप्रिल रोजी होणार असून त्याला सुवानवणी पर्यंत कोठडीत रहावे लागणार आहे. तर भारतीय तपास यंत्रणेसाठी हे मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे.
भारताची बाजू मांडणारे टॉबी कॅडमन (Toby Cadman) यांनी एका साक्षीदाराला धमकी देण्यात आली असल्याचे कोर्टात सांगितले. तसेच भारतीय तपास यंत्रणेलासुद्धा सहकार्य करत नसून त्याला जामिन मिळाल्यास प्रथम तो देश सोडून पळणार असल्याचे कॅडमन यांनी म्हटले आहे. त्यामुळे जामिनासाठी केलेला अर्ज मंजुर करु नये.(हेही वाचा-PNB Scam: फरार आरोपी नीरव मोदी ओळख लपवण्यासाठी करणार होता प्लास्टिक सर्जरी)
मात्र सुनावणी पूर्वी नीरव मोदी यांच्या वकिलांकडून असे सांगण्यात आले की, प्रभावीपणे याचिका दाखल करण्याचा करु. परंतु त्यांना त्यासाठी यश आले नाही. तर नीरव ह्याला लंडन येथे अटक झाल्यानंतर यापूर्वी जिल्हा न्यायाधीश मेरी मॅलोनच्या कोर्टासमोर नीरव मोदी ह्याचा अर्ज फेटाळला होता. तर आचा दोन अब्ज डॉलर्सच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी हा भारताला हवा असल्याचे कॅडमन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा एकदा नीरव मोदी याच्या जामिनाचा अर्ज फेटाळून लावल्याने त्याला कोठडीतच रहावे लागणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
