PM Modi addressing the nation | (Photo Credits: DD News)

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झुंजत आहे. कोरोनावर उपाय शोधण्यासाठी आणि या विषाणूंच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वच देश सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र सध्याच्या भयंकर परिस्थितीत कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन (Hydroxychloroquine) या मलेरियाच्या औषधाचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे जगभरातून याची मागणी वाढली आहे. अमेरिके पाठोपाठ ब्राझील, इस्त्राईल या देशांनीही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन मागणी भारताकडे केली आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती पूर्णही केली. त्यामुळे इस्त्राईल पंतप्रधान आणि ब्राझील राष्ट्राध्यक्ष यांनी पीएम नरेंद्र मोदी यांचे ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत. यावर पीएम मोदी यांनी त्यांच्या शैलीत प्रतिक्रीया दिली आहे.

इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रीया देताना मोदी म्हणाले की, "आपण एकत्रितपणे या संकटाचा सामना करु. आपल्या मित्रांना शक्य ती मदत करण्यासाठी भारत नेहमीच तयार असतो. मी इस्त्राईलच्या नागरिकांना चांगले आरोग्य लाभावे अशी प्रार्थना करतो."

PM Modi Tweet:

तर ब्राझील राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांनी मानलेल्या आभारावर प्रतिक्रीया देताना पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, "या आव्हानात्मक काळात भारत-ब्राझीलची पार्टनरशीप पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल." तसंच ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना धन्यवाद देत मोदी म्हणाले की, "या महामारी विरोधात सुरु असलेल्या लढ्यात योगदान देण्यासाठी भारत सज्ज आहे."

PM Modi Tweet:

यापूर्वी अमेरिकेच्या Hydroxychloroquine च्या मागणीची पूर्तता भारताने केली होती. यावर मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करत अमेरिका ही मदत विसरणार नाही, अशा भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यावर उत्तरताना मोदींनी या गंभीर संकटात शक्य ती मदत करण्यासाठी भारत सज्ज आहे, असे म्हटले होते. या सर्व ट्विटमधून मोदींचा माणुसकीचा संदेश कायम दिसत आहे.