Plastic Rain: प्लास्टीकचा पाऊस, काय सांगता? खरोखरच? जाणून घ्या नेमकं काय घडतंय!
Plastic | Representational image (Photo Credits: pxhere)

प्लास्टीकचा पाऊस (Plastic Rain) किंवा प्लास्टीकचे धुके (Plastic Mist ) म्हटले की अनेकांना आश्चर्य वाटू शकते. आजवर पाऊस म्हटलं की आभाळातून पडणारा पाण्याचा पाऊस इतकेच आपणास माहिती असते. फार फार तर बर्फाळ प्रदेशात होणारा हीमवर्षाव आपणास माहिती असतो. हीमवर्षाव हे सुद्धा गोठलेले पाणीच असते. मग हा प्लास्टिकचा पाऊस आहे तरी काय? तर मंडळी प्लास्टीकचा पाऊस हा काही सिद्धात किंवा शोधण्याची बाब नाही. ही एक परिस्थिती आहे आणि ज्याचा मानवी जीवनावरच नव्हे तर एकूण सृष्टीवरच प्रचंड मोठा परिणाम होतो आहे.

ब्लूमबर्गने नुकतेच एक वृत्त प्रसाशिकत केले आहे. या वृत्तानुसार, एकट्या न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात सन 2020 मध्ये सुमारे 74 मेट्रिक टन मायक्रोप्लास्टिक वातावरणात टाकले गेले आहे. या आठवड्यात पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान (Environmental Science & Technology) विषयक अभ्यास प्रकाशित करणाऱ्या एका अहवाानुसार हे प्रमाण 3 दशलक्ष प्लास्टिकच्या बाटल्यांच्या समकक्ष आहे. (हेही वाचा, Plastic Bottle Side Effects: प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी ठरू शकते स्लो पॉयझन; दुष्परिणामांमुळे उद्धभवू शकतात 'या' आरोग्य समस्या, आजच बदला तुमची सवय)

जगभरातील अभ्यासकांनी विविध अभ्यासांचा दाखला देत म्हटले आहे की, जगभरातील देशांची सरकारे प्लास्टिकबंदी राबविण्याचा काम केवळ नायकीय पद्धतीने करतात. ब्लूमबर्कने एका अहवालाचा दाखला देत म्हटले आहे की, साधारण 9-आठवड्यांच्या कालावधीत ऑकलंड, न्यूझीलंडमधील दोन सॅम्पलिंग साइट्सवरून मायक्रोप्लास्टिक्स (MPs) च्या वातावरणातील साचण्याची तपासणी केली.

एका दिवसात एक चौरस मीटरमध्ये, ऑकलंडच्या अभ्यासात असे आढळून आले की 2020 मध्ये हवेतून पसरणाऱ्या प्लास्टिकची सरासरी संख्या 4,885 होती. लंडनमधील 2020 च्या अभ्यासात 771, हॅम्बर्गमधील 2019 च्या अभ्यासात 275 आणि 2016 च्या अभ्यासात 110 ची तुलना होते. पॅरिस. ऑकलंड अभ्यासामध्ये लहान आकाराच्या श्रेणींचा समावेश केल्यामुळे ही विसंगती मुख्यत्वे आहे, जी पूर्वीच्या संशोधनाचा भाग नव्हती.

ऑकलंडच्या अभ्यासात असे आढळून आले की 2020 मध्ये हवेतून पसरणाऱ्या प्लास्टिकची सरासरी संख्या एका दिवसात एक चौरस मीटरमध्ये 4,885 होती. लंडनमधील 2020 च्या अभ्यासात 771, हॅम्बर्गमधील 2019 च्या अभ्यासात 275 आणि 2016 च्या अभ्यासात 110 ची तुलना केली जाते. ही तुलना करता भविष्यातील धोके अधोरेखीत होतात.