Plastic Bottle Side Effects: प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी ठरू शकते स्लो पॉयझन; दुष्परिणामांमुळे उद्धभवू शकतात 'या' आरोग्य समस्या, आजच बदला तुमची सवय
Plastic Bottle (PC - Pixabay)

Plastic Bottle Side Effects: प्लॅस्टिक (Plastic) हे नेहमीच आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहे. प्लास्टिकच्या सततच्या वापरामुळे केवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर त्यामुळे आपल्या पर्यावरणाचेही खूप नुकसान होते. आपले काम सोपे करण्यासाठी प्लास्टिक खूप उपयुक्त आहे. यामुळेच आजकाल अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. यापैकी एक गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या बाटलीचा (Plastic Bottle) वापर लोक मोठ्या प्रमाणात करतात.

इतकंच नाही तर बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या आणि डिझाइन्सच्या अनेक प्रकारच्या बाटल्या उपलब्ध आहेत, ज्यांचा लोक सतत वापर करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का की, प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेले पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलने पाणी पीत असाल तर वेळीच सावध व्हा. प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने कोणते तोटे होतात, ते जाणून घ्या...(हेही वाचा - Single Use Plastic Ban: 1 जुलैपासून 'या' प्लास्टिक वस्तूंवर बंदी; पकडल्यास भरावा लागेल 'इतका' दंड)

प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने उद्धभवू शकतात 'या' आरोग्य समस्या - 

प्लास्टिकच्या बॉटलमधले पाणी आहे एक प्रकारचे स्लो पॉयझन -

प्लास्टिकमध्ये अनेक प्रकारची हानिकारक रसायने आढळतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याला खूप हानी पोहोचते. जर तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवले तर त्यात फ्लोराईड, आर्सेनिक आणि अॅल्युमिनियमसारखे हानिकारक घटक तयार होतात, जे सेवन केल्याने ते आपल्या शरीरात स्लो पॉयझनसारखे काम करते. त्यामुळे तुमची तब्येत हळूहळू बिघडू लागते.

कर्करोगासह अनेक आजारांचा धोका -

प्लॉस्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने त्यातील घातक रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. प्लॅास्टिकमध्ये असलेली हानिकारक रसायने जसे की शिसे, कॅडमियम आणि पारा शरीरात कर्करोग, अपंगत्व यासारख्या गंभीर समस्यांची शक्यता वाढवतात.

प्रतिकारशक्तीवर होतो गंभीर परिणाम -

प्लॅास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवलेले पाणी प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका तर वाढतोच, पण त्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो. वास्तविक, प्लास्टिकमध्ये असलेली हानिकारक रसायने पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

प्रजनन समस्या -

प्लास्टिकच्या सततच्या वापरामुळे त्यात असलेल्या रसायनांमुळे महिला आणि पुरुषांच्या प्रजनन समस्या देखील उद्भवू शकतात. वास्तविक, हानिकारक रसायनांमुळे गर्भाशयाशी संबंधित आजार, स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो. याशिवाय प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. (हेही वाचा - Plastic Straw Ban: प्लास्टिक स्ट्रॉवर पूर्णपणे बंदी? केंद्र सरकारचा निर्णय, Amul ने स्ट्रॉच्या वापरासाठी मागितली मुदतवाढ)

प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिण्याचे अनेक तोटे आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी बीपीए फ्री प्लास्टिक बाटली वापरण्याचा प्रयत्न करा. याशिवाय काचेची, तांब्याची किंवा स्टेनलेस स्टीलची बाटली वापरणे अधिक योग्य असेल.