Plane Crash in California (फोटो सौजन्य - X/@RoosterGM)

Plane Crash in California: अमेरिकेतून विमान कोसळल्याची (US Plane Crash) बातमी समोर येत आहे. या विमान अपघातात वैमानिकाला आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर विमान दोन घरांच्या छतावर पडले, ज्यामुळे घरांना आग लागली. अग्निशमन दलाचे 40 हून अधिक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. तथापि, विमान अपघातामुळे घरांचा मोठा भाग कोसळला.

विमान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी ज्या रस्त्यावर विमाने कोसळले होते त्या रस्त्यावर सामान्य लोकांच्या हालचालींवर बंदी घातली. लोकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला. (हेही वाचा - Thai Police Plane Crash: थाई पोलिसांचे विमान समुद्रात कोसळले; 5 जणांचा मृत्यू (Watch Video))

लॉस एंजेलिसजवळ झाला अपघात -

प्राप्त माहितीनुसार, लॉस एंजेलिसपासून फक्त 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅलिफोर्नियातील सिमी व्हॅलीमध्ये हा अपघात झाला. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत, ज्यामध्ये घराच्या छतावरून धूर निघताना दिसत आहे.  (वाचा - Amreli Plane Crash: गुजरातच्या अमरेलीत प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू)

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात -

परिसरात मोठ्या संख्येने पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. 40 हून अधिक कर्मचाऱ्यांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन विभागानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दोन्ही घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झालेले नाही. तथापि, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे घराचा मोठा भाग जळून खाक झाला आहे.

अपघाताची चौकशी सुरू -

कॅलिफोर्निया प्रशासनाने अद्याप या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या अपघातात पायलटचाही मृत्यू झाला. या विमान अपघाताचे कारणही समोर आलेले नाही. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ या घटनेची चौकशी करत आहे.