डेंग्यू बाधित व्यक्तीशी शरीर संबंध ठेवल्यास होऊ शकते लागण? जाणून घ्या सविस्तर
झिका व्हायरस ( फोटो सौजन्य- गुगल)

ज्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो त्या भागात डेंग्यू बाधित व्यक्ती आढळण्याची शक्यता जास्त असते. डेंग्यूच्या डासांमुळे दिवसेंदिवस डेंग्यूची लागण होणा-यांची संख्याही वाढत चालली आहे. मात्र स्पेनमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. येथे एका डेंग्यू बाधित पुरुषाने पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवल्याने तिलाही डेंग्यूची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवभारत टाईम्स च्या वृत्तानुसार, ही जगातील पहिला घटना आहे जेथे सेक्स द्वारा डेंग्यूचा फैलाव केल्याचे दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

स्पेनच्या माद्रिद शहरात 41 वर्षाच्या पुरुषाने असे सांगितले की, त्याने त्याच्या पुरुष जोडीदारासह सेक्स केल्यानंतर त्यालाही डेंग्यूची लागण झाली. त्याच्या जोडीदाराला तेव्हा डेंग्यू झाला होता जेव्हा तो एका सहलीनिमित्त क्युबा गेला होता तेथे त्याला डेंग्यूच्या डासांनी चावले होते आणि हा 41 वर्षीय व्यक्ती अशा कोणत्याही देशात गेला नव्हता जिथे डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती.

त्यानंतर त्याने जेव्हा आपली वीर्य चाचणी केली तेव्हा त्याला ही गोष्ट आढळून आली. तेव्हा त्यांना असेही कळाले की या दोघांच्या वीर्यामधील डेंग्यूचा वायरस आणि क्यूबामधील डेंग्यू वायरस हा सारखा आहे. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून असे सांगण्यात आले की, डेंग्यूचा वायरस हा शारीरिक संबंध ठेवताना एका पुरुषामधून दुस-या पुरुषामध्ये वीर्याद्वारे गेला.

हेदेखील वाचा- भयावह! तेलंगणामध्ये डेंग्यूमुळे अवघ्या 15 दिवसांत कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू; फक्त नवजात अर्भक बचावले

तथापि डेंग्यू हा केवळ एडीज इजिप्टि डासांमुळे होतो जे स्थिर पाण्यात आढळतात. वेळेवर यावर उपचार न घेतल्यास तो तुमच्या आरोग्यास घातक ठरु शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे डेंग्यू बाधित व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवणे हे आरोग्यास घातक आहे असे सांगण्यात येत आहे. जोपर्यंत हा आजार पुर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीशी शरीर संबंध न ठेवणे बरे असेही त्यांनी सांगितले आहे.