अमेरिका-मेक्सिको सीमेवर महाकाय भिंत, डोनाल्ड ट्रम्प यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प; पेंटॅगॉनकडून तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर
Donald Trump (Photo Credits: Getty)

अमेरिकेकडून अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर एक मोठी भिंत उभारण्याचा प्रकल्प सुरु होणार होणार आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकेचे संरक्षण कार्यालय असलेल्या पेंटॅगॉन (Pentagon) ने तब्बल 1 अब्ज डॉलर मंजूर केले आहेत. अमेरिकेच्या संरक्षण कार्यालयाने अशी भिंत उभा करण्याची सूचना दिली होती. सीमेवर भिंत उभारली जात असताना या भागातील रस्ते सुधारले जातील. याशिवाय पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात येईल हा यामागचा हेतू आहे. अमेरिकेच्या संरक्षण कार्यालयाचे प्रमुख असलेल्या पॅट्रिक शानाहान (Patrick Shanahan)  यांनी सोमवारी अशा प्रकारे इतक्या मोठ्या रकमेची मंजुरी दिली गेली असल्याची घोषणा केली.

ही भिंत डोनाल्ड ट्रम्प यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी याबद्दलचे आश्वासन दिले होते. संसदेने अजूनही याबाबत काही पावले उचलली नाहीत, तसेच निधीही उभा केला केला नाही हे पाहून काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांनी ट्रम्प यांची निंदा केली होती. त्यानंतर आता हा निधी मजूर केला गेला आहे. ही भिंत अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभा केली जाणार असून, तिची लांबी 92 किलोमीटर तर उंची 5.5 मीटर असेल. (हेही वाचा: 'बाय..बाय' म्हणत डोनाल्ड ट्रम्प यानी बैठकीतून घेतला काढता पाय)

या प्रकल्पासाठी ट्रम्प इतके आग्रही होते की, या प्रकल्पासाठी जर निधी जमा होऊ शकला नाही. तर, देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचीही धमकी ट्रम्प यांनी दिली होती. बेकायदेशीर मार्गाने देशात घुसणाऱ्या घुसखोरांना चाप लावण्यासाठी ट्रम्प ही भिंत उभारू इच्छितात. त्यानंतर आता 'आर्मी कोअर ऑफ इंजिनियर्सच्या कमांडरना सुरक्षा, सीमाशुल्क विभागाच्या मदतीसाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आला आहे,' अशी माहिती पेंटॅगॉनकडून प्रसिद्धीपत्रातून देण्यात आली आहे.