पेनसिल्व्हेनिया येथील एका 49 वर्षीय बेंजामिन गुआल नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कौटुंबीक हिंसाचार आणि हत्येचा आरोप आहे. प्राथमिक माहितीमध्ये पुढे आले आहे की, या व्यक्तीच्या गर्लफ्रेंडने (जी त्याची पत्नी होती) कापलेल्या केसांची शैली आवडली नाही म्हणून चक्क त्याने तिची हत्या केली. पेनलाईव्हला अधिकाऱ्यांना मिळालेल्या न्यायालयीन कागदपत्रांनुसार, गुआलयाने 50 वर्षीय कारमेन मार्टिनेझ-सिल्वा हिचा हेअरकट आवडला नाही. ज्यामुळे तो रागाला आला आणि संतप्त होऊन चाकूने भोसकून तिला ठार केले.
मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं
पीडितेच्या मुलीने पोलिसांना सांगितले की गुआलने यापूर्वी केस कापल्याबद्दल तिच्या आईला धमकी दिली होती, ज्यामुळे मार्टिनेझ-सिल्वा रात्रीसाठी तिच्या मुलीच्या घरी तात्पुरता आश्रय घ्यावा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी, ती तिच्या भावाच्या निवासस्थानी गेली आणि एका मित्राने गुआलला सांगितले की ती संबंध संपवत आहे. ज्याचा तपशील संभाव्य कारण प्रतिज्ञापत्रात देण्यात आला आहे. न्यायालयाच्या नोंदीत पुढे आले आहे की, गुआल सक्रियपणे मार्टिनेझ-सिल्वाचा शोध घेत होता आणि अखेरीस ती तिच्या भावाच्या घरी सापडली. तो आला तेव्हा तिच्या भावाने सुरुवातीला त्याला सांगितले की ती तिथे नाही. पण, गुआल थोड्या वेळाने परत आला आणि मार्टिनेझ-सिल्वाच्या भावावर चाकूने हल्ला केला. मार्टिनेझ-सिल्वाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतू, गुआल इतका हिंस्त्र झाला होता की, ज्यामुळे त्याने तिची हत्या केली. (हेही वाचा, Domestic Violence Case: पत्नीला 'सेकंड हँड बायको' म्हणणे पतीला पडले महागात; न्यायालयाने दिले 3 कोटी भरपाई देण्याचे आदेश)
आरोपीस घटनास्थळावरुन अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्टिनेझ-सिल्वा घटनास्थळीच मृतावस्थेत आढळली. तिचा भाऊ देखील जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. गुआलचा चाकू हल्ला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी दोघेही जखमी झाले. पोलीस पोहोचले तेव्हा रक्ताने माखलेला चाकू हातात पकडून गुआल कारमध्ये बसलेला आढळला. त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, गंभीर हल्ला आणि बेपर्वाईने धोका निर्माण करणे यासह अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याला सध्या जामिनाशिवाय लँकेस्टर काउंटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी गोफंडमीची स्थापना केली
मार्टिनेझ-सिल्वाच्या कुटुंबीयांनी तिच्या अंत्यसंस्काराचा खर्च भागवण्यासाठी मदत करण्यासाठी, तिच्या दुःखद मृत्यूबद्दल त्यांचे दुःख आणि धक्का व्यक्त करण्यासाठी गोफंडमी पृष्ठ तयार केले आहे. "आमच्या प्रिय कारमेनसोबत अशी शोकांतिका घडेल याची आम्ही कधीही कल्पना केली नव्हती. कोणतेही योगदान, कितीही लहान असले तरी, तिला तिच्या पात्रतेनुसार तिच्या अंत्यसंस्कारासाठी आम्हाला महत्त्वाची ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.