Heart Attack In Casino | (Photo credit: archived, edited, representative image)

एखादी गोष्ट मिळविणे, जिंकणे आणि त्यात यशस्वी झाल्यानंतर ती पचवणे सर्वांनाच शक्य होत नाही. सिंगापूर (Singapore) येथील कॅसिनोमध्ये अशीच एक घटना घडली. एका व्यक्तीस तब्बल £3.2 मिलीयन म्हणजेच 33.76 कोटी रुपये इतका जॅकपॉट (Jackpot) जिंकला. हा आनंद त्याला फार काळ टिकवता आला नाही. जॅकपॉट जिंगण्याचा आनंद साजरा करतानाच त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. ही घटना सिंगापूर येथील मरीना बे सँड्स कॅसिनोमध्ये (Marina Bay Sands Casino) 22 जून रोजी घडली. ज्यामुळे एकच खळबळ उडवली.

आनंदाने हर्षवायू

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मृत्यू झालेला व्यक्ती हा कॅसीनोमध्ये येणारा नियमीत पाहुणा होता. पाठिमागील अनेक दिवसांपासून तो जॅकपॉट लावत असे, पण प्रथमच त्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर जिंकता आली. जॅकपॉट लागल्यावर त्याला प्रचंड आनंद झाला. तो आनंद तो साजरा करु लागला पण तो इतका उत्साहीत झाला की, दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला.

हवेत ठोसा मारला आणि जमीनीवर कोसळला

घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात news.com.au ने म्हटले की, जॅकपॉट जिंकल्यानंतर विजेत्या व्यक्तीने हवेत ठोसा मारला. हात उंचावून सर्वांना विजयाचे चिन्ह दाखवले आणि पुढच्या काहीच क्षणांमध्ये तो जमीनीवर कोसळला. ते पाहून सर्वांनाच काहीसा धक्का बसला. कॅसिनोचे कर्मचारी वैद्यकीय मदत देण्यासाठी धावत असताना घाबरलेले लोक त्याच्याभोवती जमले. त्या पुरुषासोबत असलेल्या एका महिलेला कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार देताना विनवणी करताना ऐकले. त्याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आता तो सावरला आहे आणि हृदयविकाराच्या झटक्यातून बरा झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून जीविताला धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा

दरम्यान, सोशल मीडियावर मात्र सदर व्यक्तीचा व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. कॅसिनो व्यवस्थापन आणि उद्योगविश्वातील त्याच्याशी संबंधीत लोकांनी तो जिवंत असल्याची पुष्टी केली आहे. तो रुग्णालयात आहे आणि आता तो बरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कॅसिनोच्या प्रवक्त्याने खोटे वृत्त आणि माहितीच्या प्रसाराचा निषेध केला आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाला झालेल्या त्रासावर जोर दिला. "दुर्दैवाने, खोट्या बातम्या पसरल्या आहेत आणि अद्यापही ऑनलाइन फिरत असलेल्या व्हिडिओमुळे आमच्या अतिथीच्या कुटुंबाला त्रास होत आहे," असे प्रवक्त्याने सांगितले. याव्यतिरिक्त, जुगारात सदर व्यक्तीने जिंकलेल्या अचूक रकमेबद्दल उलटसुलट चर्चा आहेत, परंतु कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण प्रदान केले गेले नाही.

मरीना बे सँड्स कॅसिनोची मालकी आणि संचालन लास वेगास सँड्स येथील नेवाडा-आधारित कंपनीने करते. जिने गेल्या वर्षी $10.4 अब्ज इतकी कमाई नोंदवली आहे. दरम्यान, सन 2021 मध्येही अशीच एक घटना घडली होती. ज्यामध्ये मिशिगन येधील एक माणूस समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला होता आणि त्याच्या खिशात लॉटरी जिंकल्याचे तिकिट आढळळे होते.