Pakistani YouTubers Shoaib Chaudhary, Sana Amjad (Photo Credits: X/ @AMirza86155555)

भारत समर्थक कंटेंटसाठी (Pro-India Content) ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी युट्यूबर्स (Pakistani YouTubers) सना अमजद (Sana Amjad) आणि शोएब चौधरी (Shoaib Chaudhary) हे दोघे दोन आठवड्यांहून अधिक काळ बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. या प्रभावशाली व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्यामुळे पाकिस्तानी लष्कर (Pakistan Army) आणि अधिकाऱ्यांनी त्यांना गुप्तपणे फाशी दिली की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यांचे स्वारजनीक प्लॅटफॉर्मवरुन गायब होणे हे पाकिस्तानातील दडपशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे मानले जात आहे.

सोशल मीडियावर आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांनी सुद्धा सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, अमजद आणि चौधरी या दोघांनाही त्यांच्या वादग्रस्त कंटेंटसाठी पाकिस्तानी सैन्याने फाशी दिली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर भेटीचे कौतुक करणारा सना अमजदच्या यूट्यूब चॅनलवरून व्हायरल झालेला व्हिडिओ काढून टाकल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. व्हिडिओ गायब झाल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार वादविवाद सुरू झाले आहेत, अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की ही कारवाई राजकीय दबावामुळे झाली आहे का?. (हेही वाचा, Land Corruption Case: मोठी बातमी! जमीन भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांची शिक्षा)

पाकिस्तानी युट्युबर्सना फाशी?

पाकिस्तानी युट्युबर्सच्या कंटेंटवरुन वाद

एफआयएची कारवाई

एफआयएच्या कारवाईने मीडियाचे लक्ष वेधले आहे, ज्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना त्यांच्या कारवायांना योग्य ठरवण्यास भाग पाडले आहे. एजन्सीने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते शाहबाज गिल आणि युट्यूबर मोईद पिरजादा यांसारख्या उच्च-प्रोफाइल व्यक्तींविरुद्ध पीईसीए- 2016 सायबर गुन्हे कायद्याअंतर्गत राज्यविरोधी प्रचार केल्याच्या आरोपाखाली खटले दाखल केले आहेत. गिल आणि पिरजादा दोघेही सध्या परदेशात राहतात. दरम्यान, अमजद आणि चौधरी कुठे आहेत याची अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही, ज्यामुळे जनता आणि मीडिया अंधारात आहे.

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

दोन्ही प्रभावशाली व्यक्तींच्या बेपत्ता होण्याने सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले आहे, नेटिझन्स पाकिस्तानमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मतभेदांचे दमन केल्याच्या आरोपांवर वादविवाद करत आहेत. अनेक वापरकर्ते त्यांच्या स्थिती आणि सुरक्षिततेबाबत अधिकाऱ्यांकडून पारदर्शकता ठेवा आणि उत्तरे द्या अशी मागणी करत आहेत. दरम्यान, सना अमजद आणि शोएब चौधरी यांच्या कथित शिक्षेची किंवा ताब्यात घेतल्याची पुष्टी करण्यासाठी कोणतेही विश्वसनीय पुरावे सादर झालेले नाहीत. अशा काळा आम्ही म्हणजेच लेटेस्टली येथे दाव्यांतील सत्यता पडताळू शकत नाही.