Pakistan MP Dance: 'टिप-टिप बरसा पानी'वर पाकिस्तानच्या खासदाराने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ 
Pakistan MP (Photo Credit - Twitter)

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) नुकत्याच आलेल्या 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपटात पुन्हा तयार करण्यात आलेले 'टिप-टिप बरसा पानी' होते, ज्यामध्ये अक्षयसोबत कतरिना कैफ (Katrina Kaif) दिसली होती. या रिक्रिएट गाण्यालाही लोकांनी भरभरून प्रेम दिले. त्याचवेळी हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे पाकिस्तानचे खासदारा (Pakistan MP Dance) यांनी या गाण्यावर केलेला डान्स. कतरिना कैफच्या या गाण्यावर पाकिस्तानी टेलिव्हिजन होस्ट आणि राजकारणी आमिर लियाकत हुसैन (Aamir Liaquat Hussain) यांनी धमाकेदार डान्स केला आहे. आमिर एका कार्यक्रमात 'टिप-टिप बरसा पानी' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आमिर हे ऑगस्ट 2018 पासून पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत. त्यामुळेच त्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाला आहे.

Tweet

पाकिस्तानचे खासदार आमिर लियाकत हुसैन यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ते चांगले डान्सर आहे यात काही शंका नाही. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणीही कौतुक करेल. वास्तविक, तैमूर जमान नावाच्या युजरने आपल्या ट्विटर अकाउंटवर आमिर यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. (हे ही वाचा पाकिस्तानातील एका बेकरीत केकवर ‘Merry Christmas’ लिहिण्यास स्टाफचा नकार; गोंधळानंतर दिले हे उत्तर.)

आमिर लियाकत हुसैनचा व्हिडिओ इंटरनेटवर घालत आहे धुमाकूळ

पाकिस्तानच्या आमिर लियाकत हुसैनच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोक त्याचा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत, मात्र हा व्हिडिओ कोणत्या घटनेचा आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.