पाकिस्तानातील एका बेकरीत केकवर ‘Merry Christmas’ लिहिण्यास स्टाफचा नकार; गोंधळानंतर दिले हे उत्तर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पाकिस्तानमध्ये (Pakistan) धार्मिक कट्टरता किती प्रमाणात पसरली आहे हे अलीकडेच दिसून आले, जेव्हा कराचीतील एका बेकरीच्या कर्मचाऱ्याने ग्राहकाच्या सांगण्यावरून केकवर 'मेरी ख्रिसमस' लिहिण्यास स्पष्टपणे नकार दिला. फ्रायडे टाइम्सच्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. केकवर 'मेरी ख्रिसमस' लिहिण्यास नकार देत कर्मचाऱ्याने महिलेला सांगितले की हे व्यवस्थापनच्या बाहेर आहे आम्हाला असे करण्यास सांगितले नाही आहे. जेव्हा महिलेने फेसबुक ग्रुपवर तिचा अनुभव लिहिला तेव्हा ती पोस्ट व्हायरल झाली. पोस्टवर अनेक जणांनी कंमेट करुन आश्चर्य व्यक्त केले आहे.  या महिलेने सांगितले की, ती केक खरेदी करण्यासाठी डेलिझियाच्या खयबान-ए-जामी शाखेत गेली होती, परंतु जेव्हा तिने तेथील कर्मचाऱ्याला केकवर 'मेरी ख्रिसमस' लिहिण्यास सांगितले, तेव्हा एका कर्मचाऱ्याने सांगितले की आम्हाला किचन मधुन आदेश आहे की असे करायचे नाही.

यानंतर सोशल मीडियावर या वर्तनावर टीका होऊ लागल्यावर बेकरी व्यवस्थापनानेही आपले स्पष्टीकरण दिले आहे. धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, असेही बेकरी चेनने स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी डेलिझियाच्या व्यवस्थापनाला हे धोरण स्वीकारले आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी बोलावले. सारा नदीमने ट्विटरवर लिहिले की, "कराचीतील बेकरीमध्ये लज्जास्पद भेदभावपूर्ण वागणूक.. केकवर मेरी ख्रिसमस लिहिण्यास नकार." (हे ही वाचा भारताविरोधी खोटेपणाच्या प्रचाराला भारताचा पाकिस्तानला जोरदार झटका, 20 यूट्यूब चॅनेल आणि 2 वेबसाइटवर कारवाई.)

केकवर 'मेरी ख्रिसमस' लिहिण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याच्या वैयक्तिक क्षमतेनुसार असे केले आणि व्यवस्थापनाने आपले हात वर करत आम्ही याला जबाबदार नाही असे ही सांगितले, तसेच, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई सुरू असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले.

पुढे, बेकरी व्यवस्थापनाने असेही स्पष्ट केले की कर्मचार्‍यांची ही वृत्ती 'मेरी ख्रिसमस' बद्दल जागरूकता नसल्याचा परिणाम असू शकते. व्यवस्थापनाने पुढे सांगितले की ते 'मेरी ख्रिसमस'च्या शुभेच्छांचा गैरसमज करत नाहीत आणि या घटनेमुळे ते दु:खी आहेत. पुढे व्यवस्थापनाने सांगितले की बेकरीचे अधिकृत निवेदन लवकरच त्याच्या सोशल मीडिया प्रसिद्ध केले जाईल.