PUBG गेम आणि प्रेम प्रकरण: बायको, मुलांसह परत पाठवा; पाकिस्तानी नागरिकाचे मोदी सरकारला साकडे
Seema Ghulam Haide | (Photo Credit- PTI)

पबजी (PUBG) गेम खेळता खेळता भारतीय तरुणावर जडलेल्या प्रेमापोठी चक्क तीन देशांच्या सीमा ओलांडून दिल्ली येथे पोहोचलेल्या पाकिस्तानी महिलेने (Pakistani Woman) खळबळ उडवून दिली आहे. सीमा गुलाम हैदर (Seema Ghulam Haider) असे या महिलेचे नाव. ही महिला आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या पतीने केलेल्या मागणीमुळे. पहिलेचा पतीने भारत सरकारकडे मागणी केली आहे की, कृपा करुन माझी बायको आपल्या चार मुलांसोबत परत पाठवा. गुलाम हैदर याने सौदी अरेबिया येथून एक व्हिडिओ जारी करत हे अवाहन केले आहे.

सीमा गुलाम हैदर हिला मोबाईलवर पबजी गेम खेळता खेळता एका भारतीय तरुणावर प्रेम जडले. त्यानंतर या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हे दोघे एकदा नेपाळमध्ये एकमेकांना भेटले. त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानची सीमा ओलांडून या महिलेने नेपाळमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तीने नेपाळ-भारत सीमा ओलांडली आणि थेट भारतात प्रवेश मिळवला. दरम्यान, बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेचा पती उलम हैदर याने भारत सरकारला आपल्या पत्नी आणि मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याचे मनापासून आवाहन केले.

गुलाम हैदर यांने नरेंद्र मोदी सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची कळकळीची विनंती व्हिडिओमध्ये केली आहे. त्याने म्हटले आहे की, त्याची पत्नी आणि मुलांना त्यांच्या मूळ देशात, पाकिस्तानला पाठविण्यात यावे. आपल्या पत्नीला PUBG च्या माध्यमातून भारतात येण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत दिशाभूल करणअयात आल्याचा आरोपही त्याने केला आहे. पुढे त्याने म्हटले आहे की, कृपा करुन माझा संसार पुन्हा एकत्र यावा अशी माझी विनंती आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करावेत. (हेही वाचा, Greater Noida: ऐकावे ते नवलंच! PUBG खेळताना पाकिस्तानी महिला पडली भारतीय तरुणाच्या प्रेमात; लग्न करण्यासाठी आपल्या 4 मुलांसह आली भारतात)

पाकिस्तानी महिलेचा भारतात अनधिकृतरित्या येण्याच्या घटनेला वेगवेगळ्या दृष्टीकोणातून पाहिले जात आहे. एका बाजूला काही लोकांना वाटते प्रेमाला जात, धर्म, देश, प्रदेशाच्या सीमा नसतात. ते मुक्त असते. तर काही लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा आहे असे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विविध अंगांनी तापास सुरु आहे. सध्या स्थितीमध्ये महिला सीमा गुलाम हैदर आणि तिची चार मुले तसेच तिचा भारतातील कथीत प्रियकर सचिन हा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. दोघांची कसून चौकशी सुरु आहे.