पबजी (PUBG) हा एक अतिशय प्रसिद्ध ऑनलाइन बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये तुम्ही जगभरातील लोकांसोबत टीम बनू शकता. अनेकदा नवीन खेळाडूंसोबत टीम बनवता येते, जिथे लोक एकमेकांचे चांगले मित्रही बनतात. आता याच खेळाशी संबंधित ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एक पाकिस्तानी महिला पबजी गेम खेळत असताना एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली. इतकेच नाही तर या आपल्या कथित प्रियकरासाठी ती बेकायदेशीरपणे आपल्या 4 मुलांसह पाकिस्तानातून नोएडाला आली.
माहितीनुसार, हा गेम खेळत असताना सीमा नावाची पाकिस्तानी महिला सचिन नावाच्या भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली. दोघेही फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर सीमा आपल्या 4 मुलांसह नेपाळमार्गे नोएडा येथे पोहोचली आणि एक महिन्यापासून राबुपुरा येथील आंबेडकर वस्तीत राहत होती. या महिलेला सचिनसोबत लग्न करायचे होते. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच महिला आणि तरुण दोघेही पळून गेले.
PUBG पर पाकिस्तानी महिला को भारतीय आदमी से हुआ प्यार, अपने 4 बच्चों के साथ आ गई ग्रेटर नोएडा
◆ सीमा नेपाल के रास्ते सचिन से मिलने आई, पुलिस महिला को पकड़ने में जुटी
PUBG | #PUBG | #Pakistan | #India pic.twitter.com/VPZ1wTtPYp
— News24 (@news24tvchannel) July 3, 2023
सध्या रबुपुरा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या दोघांचा शोध घेत आहेत. भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी ही महिला आणि सचिन लग्न करण्याचा प्रयत्न करत होते. सीमा ही सिंध प्रांतातील कराची येथील रहिवासी आहे. सीमाने कसा तरी नेपाळचा व्हिसा मिळवला आणि नंतर नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश केला. सीमा आणि सचिन एका वकीलाद्वारे लग्नासाठी कायदेशीर माहिती गोळा करत होते. या वकिलाला सीमा गुप्तहेर असल्याचा त्याला संशय होता. (हेही वाचा: रोडवेज बसमध्ये कंडक्टरने तरुणीसोबत केला सेक्स; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर निलंबित)
महिलेने माहिती दिली होती की तिचा भाऊ पाकिस्तानी लष्करात तैनात आहे. महिलेचा नवरा अनेक दिवसांपासून तिच्यापासून दूर राहतो. तिच्या चार मुलांचे वय तीन वर्षे ते आठ वर्षांदरम्यान आहे. सचिनने वकिलाला सांगितले होते की, त्याला लग्नाची औपचारिकता लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. त्यानंतर संशय आल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस या दोघांचाही शोध घेत आहेत. हे प्रकरण पाकिस्तानशी संबंधित असल्याने पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत.