UP Roadways Bus (Photo Credits: Wikimedia commons)

Sex Inside UP Roadways Bus: उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कंडक्टरने चालत्या बसमध्ये एका मुलीसोबत सेक्स (Sex) केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ही घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) येथील आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ एका प्रवाशाने रेकॉर्ड केला होता. ज्याला नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर विभागाने कारवाई केली आणि ड्रायव्हर आणि कंडक्टरला निलंबित केलं.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, हाथरस डेपोची यूपी रोडवेजची बस अलीगढहून लखनौच्या दिशेने जात होती. बसमध्ये कंडक्टरला मुलीसोबत शारिरिक संबंध ठेवताना पकडण्यात आले. एका प्रवाशाने त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ शूट करताना कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात बाचाबाची झाली. ही घटना दहा दिवसांपूर्वी घडल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, एआरएमने बसच्या चालक आणि वाहकाच्या सेवा बंद केल्या. (हेही वाचा - Legal Age for Sex: सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 18 वरून 16 करावे; High Court ची केंद्राला विनंती)

हातरस ते लखनौ या बसमध्ये कॅप्चर केलेल्या व्हिडिओमध्ये, कंडक्टर ड्रायव्हरच्या शेजारी मागच्या सीटवर एका मुलीसह संशयास्पद स्थितीत बसलेला दिसत आहे. दोघांनी सावधपणे चादरी पांघरल्या होत्या. तथापि, जेव्हा 2-3 प्रवाशांना हा प्रकार लक्षात आला तेव्हा तेथील परिस्थिती बदलते. या सर्व प्रकाराने कंडक्टर संतप्त होतो. त्यानंतर कंडक्टर प्रवाशांचे मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये जोरदार वादावादी होते.

संघर्षादरम्यान, एका प्रवाशाने दावा केला आहे की गेल्या दोन तासांपासून हा गैरप्रकार सुरू होता. तथापी, आलमबागला पोहोचल्यावर यासंदर्भात तक्रार करणार असल्याचं प्रवाशांनी सांगितलं. ही घटना लखनौच्या आसपास घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. हातरस डेपोचे एआरएम शशिरानी यांनी सांगितलं की, हा व्हिडिओ सुमारे 10 दिवस जुना आहे. प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत ड्रायव्हर आणि कंडक्टरचा करार रद्द करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचीही चौकशी करण्यात येत आहे.