Pakistan: महिलेने WhatsApp वर असे काय पाठवले ज्यामुळे महिलेला दिली फाशीची शिक्षा? जाणून घ्या अधिक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Pakistan: पाकिस्तानमध्ये अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामुळे एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिलेवर असा आरोप लावण्यात आला आहे की, व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात अपशब्दांचा वापर करण्यात आला होता. महिलेने ईशनिंदाची केस रावळपिंडी कोर्टात सुरु होती. फारुक हसनात नावाच्या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोर्टाने असे म्हटले की, महिलेने सायबर कायद्यांचे उल्लंघन, धर्माचा अपमान आणि पैगंबर मोहम्मद यांचा सुद्धा तिने अपमान केल्याने दोषी आढळली आहे.(Blast in Lahore: लाहौर येथे साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 20 लोक जखमी)

Tweet:

आरोपी अनिका अतीक हिने 2020 मध्ये व्हॉट्सअॅपवर फारुकला एक मेसेज पाठवला होता. यामध्ये ईशनिंदेसंबंधित काही बोलण्यात आले होते. त्यावर अतीक याने तिला तो मेसेज तातडीने डिलिट करण्यास सांगितला आणि माफी मागावी असे ही म्हटले. परंतु महिलेने असे केले नाही. त्यानंतर अतीक याने महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रार केल्यानंतर पोलिसांना अनिका हिला अटक केली. आता रावलपिंडी कोर्टाने या प्रकरणी महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Tweet:

पाकिस्तानात ईशनिंदा कायद्याला 80 च्या दशकात पूर्व सैन्य तानाशाह जियाउल हक यांच्याद्वारे लावण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत आतापर्यंत काही जणांना मृत्यूची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली आहे. पण आतापर्यंत कोणाला ही फाशीची शिक्षा दिली गेली नाही.

ईशनिंदा म्हणजे देवाची निंदा. जर एखादा व्यक्ती मुद्दामून पूजा करण्याच्या जागेला नुकसान पोहचवत असेल, धार्मिक भावनांचा अपमान करत असेल, धार्मिक कार्यात बाधा आणत असेल किंवा ठेच पोहवत असेल तर ते ईशनिंदाअंतर्गत येते.