Blast in Lahore: लाहौर येथे साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 20 लोक जखमी
Blast in Lahore (Photo Credits-Twitter)

Blast in Lahore: पाकिस्तानातील लाहौर शहरात गुरुवारी एकामागोमाग एक असे चार बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 20 जण गंभीर जखमी झाले असून तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. बॉम्बस्फोट ऐवढा तीव्र होता की, आजूबाजूला असणाऱ्या दुकानांसह इमारतीच्या खिडक्या फुटल्या गेल्या. तसेच बाजूला उभ्या असलेल्या मोटरसायकलींचे सुद्धा नुकसान झाले आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

लाहौरच्या ऑपरेशनचे उप महानिरिक्षक डॉ. मुहम्मद आबिद खान यांनी जिओ न्यूला सांगितले की, सध्या तपास प्राथमिक टप्प्यात आहे. परंतु लवकरच बॉम्बस्फोटामागील खरे कारण समोर आणले जाईल. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, स्फोट झाल्याने जमिनीला 1.5 फूट खोल खड्डा पडला गेला. जखमींना  शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिओ न्यूजने याची पुष्टी केली की,  बॉम्बस्फोटापूर्वी स्फोटक ही घटनास्थळी ठेवण्यात आली होती. लाहौरी गेटजवळ झालेल्या या बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि व्यापारी खरेदीसाठी येत असतात.(Abu Dhabi Airport Attack: अबुधाबी विमानतळावरातील हल्ल्यात 1 पाकिस्तानी तर 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू, 6 जखमी)

Tweet:

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती अधिक गंभीर आहे. सध्या डॉक्टरांकडून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत. पोलीस आणि प्रशासनाने संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. घटनास्थळावरुन पुरावे  एकत्रित केले जात आहेत. पोलिसांनी अद्याप हे स्पष्ट केलेले नाही की, तो एक IED होता की टाइम बॉम्ब होता.