भारत देशाच्या नव्या नकाशावकरुन पाकिस्तान संतप्त
भारताचा नवा नकाशा (Photo Credits-ANI)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) आणि लद्दाख (Ladakh) यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आल्यानंतर भारत सरकारकडून देशाचा नवा नकाशा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता त्या कारणावरुन संतप्त झाला आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारने रविवारी भारताकडून जाहीर करण्यात आलेल्या नकाशावरुन विधान करत तो पोकळ असल्याचा दावा केला आहे.

भारत सरकारने शनिवारी नव्या केंद्रशासित प्रदेशासह नकाशा जाहीर केला. हा नकाशा गृहमंत्रालयाच्या द्वारे झळकवण्यात आलेल्या नकाशामध्ये जम्मू-कश्मीरला नवे रुप मिळाले आहे. हा निर्णय पाकिस्तानला पटला नसून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी विधान करत असे म्हटले आहे की, राजकिय नकाशात जम्मू-कश्मीरमध्ये गिलगित-बाल्टिस्तान आणि आझाद कश्मीरचा काही भाग दाखवला आहे. जे कायद्याने अस्थिर आणि चुकीचे आहे. पाकिस्तानने या नकाशाला विरोध केला आहे. मात्र जम्मू-कश्मीर मधील लोकांना पाकिस्तान कडून समर्थन दिले जाईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(भारत सरकारने जाहीर केला देशाचा नवा नकाशा, नव्या रुपात जम्मू-कश्मीर आणि लद्दाख दिसणार)

खरंतर भारत सरकारने 5 ऑगस्टला जम्मू-कश्मीर मधूल कलम 370 हटवला. त्यानंतर सरकारने जम्मू-कश्मीर आणि लद्दाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्यामुळे आता भारताला 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश मिळाले आहेत. केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीर मध्ये विधानसभा असणार आहे. तर लद्दाख मध्ये प्रशासन थेट केंद्राच्या हाती असणार आहे.