Imran Khan (Photo Credits-Twitter)

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जफर मिर्जाने (Zafar Mirza) याबाबत माहिती दिली आहे. इमरान खान यांची मंगळवारी कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. कारण, इमरान यांनी ईधी फाउंडेशनचे अध्यक्ष फैसल ईधी (Faisal Idhi) यांची भेट घेतली होती. मात्र, फैसल ईधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात एकच खळबळ उडाली होती. यामुळे खबरदारी म्हणून इमरान खान यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, इमरान खान यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे कळल्यावर जफर मिर्झा यांनी आनंद व्यक्त केला आहे

इमरान खान यांची 15 एप्रिल रोजी ईधी फैसल यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर ईधी फैसल यांच्यात कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून फैसल यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी फैसल यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. या वृत्तानंतर संपूर्ण पाकिस्तानात एकाच खळबळ उडाली. दरम्यान, ईधी यांच्या संपर्कात आल्याने इमरान खान यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच इमरान खान यांनी स्वताला विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज इमरान खान यांचा कोरोना चाचणीचा अहवाल आला आणि ते कोरोना निगेटिव्ह समजत आहे. इमरान खान यांचा अहवाल निगेटिव्ह कळल्यावर जफर मिर्झा यांना आनंद व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- जग लढतेय कोरोना व्हायरसशी, तर चीन उभारत आहे जगातील सर्वात मोठे फुटबॉल मैदान; खर्च करणार तब्बल 13 हजार कोटी

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. पाकिस्तानातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानात कोरोनामुळे 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 212 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 156 लोक कोरोनामुक्त झाल्याचे आकडेवारी समोर आली आहे.