Pakistan: श्रीलंकन व्यक्तीच्या निघृण हत्येवर पंतप्रधान इमरान खान यांनी केले 'हे' मोठे विधान
Pakistan Prime Minister Imran Khan (Photo Credits: IANS/File)

Pakistan: पाकिस्तानातील सियालकोट मध्ये शुक्रावारी एका श्रीलंकन व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळला. पोलिसांनी असे म्हटले की, जमावाने त्याच्यावर ईशनिंदाचा आरोप लावत त्याला जबर मारहाण करत हत्या केली. या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा बल तैनात करण्यात आले आहे. याच घटनेवर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मोठे विधान केले आहे.(Harassment In Parliament: ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील 63 महिला खासदारांचे लैंगिक शोषण, अशा प्रकारे केली जाते वर्तवणूक)

इमरान खान यांनी असे म्हटले की, सियालकोटच्या फॅक्ट्री मध्ये झालेला हल्ला आणि श्रीलंकन मॅनेजरला जीवंत जाळण्याचा प्रकार हा पाकिस्तानसाठी लज्जास्पद आहे. मी स्वत: याच्या तपास पाहत आहे. जो कोणीही यासाठी जबाबदार असेल त्याला शिक्षा होईल. अटक प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, पाकिस्तानात घडलेल्या या प्रकारामुळे त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचसोबत ईशनिंदेच्या गोष्टीवरुन सियालकोट मध्ये फॅक्ट्री मॅनेजरची हत्येची घटना अत्यंत विचलित करण्यासारखी आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

ही घटना सियालकोट येथील वरीजाबाद रोड जवळील आहे. तर एका खासगी फॅक्ट्रीच्या कामगारांनी एक्सपोर्ट मॅनेजरवर हल्ला केला आणि त्याला जीवंत जाळले. मॅनेजर सुद्धा सियालकोट येथे राहणारा होता. सियालकोट डिस्क्ट्रिक्ट पोलीस ऑफिसर उमर सईद मलिक यांनी त्या व्यक्ती ओळख प्रियंता कुमारा असल्याचे सांगितले आहे. सियालकोट पोलिसांच्या वरिष्ठांनी अर्मागन गंडोल यांनी एसोसिएट प्रेस यांना सांगितले फॅक्ट्री कामगारांनी व्यक्तीवर आरोप लावला की, त्याने पैगंबर मोहम्मद यांच्या नावाचे पोस्ट फाडले होते. गोंडाल यांनी पुढे असे म्हटले, सुरुवातीच्या तपासात कळले मॅनजेरला फॅक्ट्रीच्या आतमध्ये सुद्धा मारहाण केली गेली.