भारतात नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तानच्या स्थितीवर एनसएसए (NSA) स्तरावरील एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये रशिया आणि पाकिस्तान सुद्धा सहभागी होणार आहे. चीन, ईराण, ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तान या देशांना सुद्धा आमंत्रित केले जाऊ शकते. ही बैठक युद्धग्रस्त क्षेत्राच्या सुरक्षिततेची स्थिती आणि तालिबान्यांचे मानवी हक्क कायम ठेवण्यासह तेथील मानवी संकटावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या बैठकीत सामील होण्यासाठी तालिबानला आमंत्रित करण्यात आलेले नाही. तर रशियाने 20 ऑक्टोंबरला मॉस्को फॉरमेट टॉक्ससाठी तालिबानला आमंत्रित केले आहे. यामध्ये भारत सुद्धा भाग घेणार आहे. परंतु भारत सरकार त्यांना आता दिल्लीत होणाऱ्या बैठकीत सहभागी करण्यासंदर्भात सतर्क असल्याचे दिसून येत आहे.
या बैठकीत पाकिस्तान सुद्धा सहभागी होणार आहे. अशातच पाकिस्तान यावेळी काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत पाकिस्तानचे एनएसए युसूफ मोईन सहभागी होणार की नाही हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. भारताला वाटते की, पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेवर लगाम लावला पाहिजे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात काम करण्यासाठी तयार असल्याचे संकेत सुद्धा दिले आहेत.(Pakistan Minister's Shocking Advice: महागाई टाळण्यासाठी पाकिस्तानी मंत्र्याचा विचित्र सल्ला- 'देशासाठी त्याग करा व कमी खा')
दरम्यान, पाकिस्तानचे एनएसए मोईद युसूफ जर भारत दौऱ्यावर आल्यास पाकिस्तानमधील एक मुख्य अधिकाऱ्याची दीर्घ काळानंतर हा प्रवास असेल. यापू्र्वी 2026 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी परदेशी प्रकरणांचे सल्लागार सरताज अजीज यांनी हार्ट ऑफ एशिया कॉफ्रेन्ससाठी अमृतर येथे दाखल झाले होते. भारताने या वर्षात मे मध्ये अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर एक कॉफ्रेन्स आयोजित करण्याचे ठरविले होते. त्यात युसूफ यांनी सहभागी होणार होते. मात्र कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे ती झाली नाही.