जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहर (Masood Azhar) याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी (Global Terrorist) घोषित केल्यानंतर आता पाकिस्तानने त्याची संपत्ती जप्त करण्याचे आणि त्याच्यावर प्रवासबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अजहरच्या शस्त्र खरेदी-विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. इस्लामिक स्टेट आणि अल कायद्यावर संयुक्त राष्ट्र प्रतिबंध समितीने बुधवारी अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी जोर धरु लागली होती. यापूर्वी अनेकदा संयुक्त राष्ट्रांकडून मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी होत होती. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावापुढे चीनने नरमाईची भूमिका घेतली. ('जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित)
मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे, हे भारताचे मोठे यश मानले जात आहे.