FATF कडून पाकिस्तान काळ्या यादीत; पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र वृत्ताचं खंडन
इमरान खान (Photo Credits: Facebook)

सध्या आर्थिक संकटाशी सामाना करणार्‍या पाकिस्तानला आता 'फायनान्शिअल  अ‍ॅक्शन टास्क फोर्स' (FATF)ने एक धक्का दिला आहे. 'फायनान्शिअल  अ‍ॅक्शन टास्क फोर्स' (FATF) या आशियन पॅसिफिक गटाने पाकिस्तानला ब्लॅकलिस्टेट केले आहे. यापूर्वी ग्रे लिस्ट मध्ये असणारा हा देश आता ब्लॅक लिस्टमध्ये आल्याने हा पाकिस्तान (Pakistan) देशासाठी एक मोठा धक्का समजला जात आहे. मात्र काही वेळातच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्ताचे खंडन करत हे वृत्त खोटे आणि तथ्यहीन असल्याचे म्हटलं आहे.

पाकिस्तान FATF च्या ब्लॅक लिस्टमध्ये आल्याने आता जगातील इतर देशांकडून कर्ज घेणं त्यांना कठीण होणार आहे. नुकतेच FATF कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तान टेरर फंडिंगसंदर्भात आपला कृती आराखडा नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात अपयशी ठरला. यासाठी पाकिस्तानला जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण पाकिस्तानने मे 2019 पर्यंत काम पूर्ण केलेलं नाही.' आता पाकिस्तानला FATF च्या ब्लॅक लिस्टमधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

ANI Tweet 

एशियन पॅसिफिक गटाने जागतिक मापदंड पूर्ण करु न शकल्याने पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केले आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना पैशांची रसद पुरवल्यावरून संबंधित 40 निषकांपैकी 32 निकष पाकिस्तानने पूर्ण केले नाहीत. परिणामी एफएटीएफने पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केलं आहे.