गर्भगळीत पाकिस्तानकडून दावा म्हणाला 'भारताच्या दोन विमानांना केले लक्ष्य'
Pakistan army spokesperson Major General Asif Ghafoor | (Photo Credits-Twitter)

भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक 2 नंतर पाकिस्तान गर्भगळीत झाला आहे. हडबडून गेलेला पाकिस्तान बदला घेण्याचा विचार करत असून, आपणही भारताविरुद्ध अशीच काहीतरी कारवाई करावी असा त्याचा विचार आहे. मात्र, नेमके काय करावे या विचाराने गोंधळून गेलेल्या पाकिस्ताने त्यांची 3 विमानं भारतीय हवाई हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या भारतीय लष्कर आणि हवाई दलापुढे पाकिस्तानी विमानांना पळ काढण्याशिवाय कोणताच पर्याय राहिला नाही. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की, आम्ही भारतीय हवाई दालच्या दोन विमानांना लक्ष्य केले आहे. तसेच, एका पायलटलाही ताब्यात घेतले आहे.

पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे विमान पाडल्याचा दावा केला आहे खरा. पण, गंमत अशी की भारतानेच पाकिस्तानचे एफ-16 या प्रकारातील विमान पाडले आहे. ह विमान भारतीय हवाई हद्दीत 3 किलोमीटर आत आले होते. मात्र, हे विमान परत जात असताना हे विमान पाकिस्तान हद्दीत भारताने पाडले आहे. विमान पडताना लोकांनी प्रत्यक्ष पाहिले. तसेच, त्यातून पॅरेशूटच्या माध्यमातून काही लोकांना विमानातून बाहेर पडतानाही नागरिकांनी पाहिल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, भारतानं पाडलं पाकिस्तानंच एफ-16 विमान, पॅरेशूटच्या माध्यमातून पाकचे पायलट पळाले)

दरम्यान, भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत भारतीय हवाई दलाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक सुरु आहे. ही बैठक संपल्यानंतर भारत पाकिस्ताच्या आगळीकीला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो याबाबत उत्सुकता आहे.

महत्त्वाची टीप: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेले वृत्त लेटेस्टलीकडे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारीत आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर संदेश प्रसारित करण्यापूर्वी वाचकांनी भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी विनंती.