Pakistan Child Marriage: पाकिस्तानात बालविवाहावरून खळबळ! 13 वर्षाच्या मुलाचा 12 वर्षाच्या मुलीची विवाह, व्हिडिओ व्हायरल (Watch)
Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pakistan Child Marriage: बालविवाहाविरोधात भारतात ठोस कायदा करण्यात आला आहे. जगातील अनेक देश बालविवाहाविरोधात कायदे बनवून त्याची कडक अंमलबजावणी करत आहेत, मात्र पाकिस्तानमध्ये मात्र 13  वर्षांच्या मुलाच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. या मुलाने लग्नाचा हट्ट धरला होता आणि त्याच्या आग्रहापुढे आई-वडील झुकले आणि त्याचे लग्न लावून दिले. माहितीनुसार, पाकिस्तानच्या कायद्यानुसार मुलांसाठी लग्नाचे वय 18 वर्षे आणि मुलींसाठी 16 वर्षे आहे. मात्र आता इथल्या एका 13 वर्षांच्या मुलाचे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. पाकिस्तानमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाने 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केले आहे. लग्न झाल्यानंतरच मी अभ्यास करीन असा हट्ट मुलाने धरला होता व त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले. (हेही वाचा: Taliban Prohibits Photographing Living Things: तालिबानचे आणखी एक नवीन फर्मान, जिवंत गोष्टींचे फोटो-व्हिडिओ काढण्यावर बंदी)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salaam! Pakistan (@salaam_pakistan)