पाकिस्तानच्या (Pakistan Blast) खैबर पख्तुनख्वा येथे आाज (सोमवारी) मोठा बॉम्बस्फोट झालाय. या हल्ल्यात 5 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बाजौरा जिल्ह्यात पोलिओविरोधी मोहिमेसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस संरक्षण दल आपल्या वाहनातून तेथे जात होते. यावेळी वाहनावरच हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. (हेही वाचा - Haryana Shocker: हरियाणामध्ये 500 मुलींचा प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप; मुख्यमंत्री Manohar Lal Khattar यांना लिहिले पत्र)
पाहा पोस्ट -
Five police officials were martyred and 27 people were injured on Monday in a blast near a police van in the Mamund tehsil of Khyber Pakhtunkhwa’s Bajaur district, officials said.#Blast #Incident #KPK #BajaurDistrict #PoliceOfficials #Martyred #Injured #TerrorAttack pic.twitter.com/9h95yeVfgO
— Spark Pakistan (@Spark_Pakistan) January 8, 2024
पाकिस्तानातला हल्ला तालिबानने केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. तसेच यामध्ये कोणत्या दहशतवादी संघटनेचे नाव आहे याबाबतही माहिती समजलेली नाही. मात्र याआधी पाकिस्तानी तालिबानने पोलिओ लसीकरण मोहिमेवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.
सदर हल्ला झालेलं हे ठिकाण बाजौरमधील मामुंद परिसर हा अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. साल 2021 रोजी अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या सीमेवर हल्ल्याच्या प्रमाणात मोठी वाढ ही झाली आहे.