Pakistan Cable Car Accident: पाकिस्तानात दुर्घटनाग्रस्त केबल कारमधून 15 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 8 लोकांचा बचाव
Pakistan Cable Car

पाकिस्तानमध्ये 900 फूट उंचीवर केबल कारमध्ये अडकलेल्या सर्व आठ जणांची सुटका करण्यात आली आहे. हे बचावकार्य 14 तास चालले. केबल कारमध्ये सहा शाळकरी मुले आणि दोन शिक्षक अडकले होते. हे सर्व लोक नेहमीप्रमाणे शाळेत जात होते. खाली खोल नदी होती, ती पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान या केबल कारमधून दोघांची मंगळवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आली. पण, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे रात्री ही कारवाई थांबवण्यात आली. बुधवारी पहाटे बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी खैबर सरकार आणि लष्कराला तातडीने बचाव कार्य करण्याचे आदेश दिले होते.  (हेही वाचा - Joe Biden India Tour: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान भारताच्या दौऱ्यावर; G-20 शिखर परिषदेत होणार सहभागी)

पाहा व्हिडिओ -

मंगळवारी सकाळपासून ज्या केबलवर कार अडकली होती, त्या केबलला आणखी एक छोटी कार जोडलेली होती. त्यामुळे अडकलेल्या लोकांसाठी अन्न आणि पाणी पाठवण्यात आले. यानंतर दोन्ही केबल्स अगदी जवळ आणून एक एक करून दोघांना बाहेर काढण्यात आले. तथापि, तज्ञांनी याला अत्यंत धोकादायक आणि उच्च-जोखीम पद्धत म्हटले आहे. याचे कारण म्हणजे ही केबल आधीच खराब झाली असून त्यावर अधिक भार टाकल्यास उर्वरित ताराही तुटण्याची शक्यता आहे. बचाव पथकाने सांगितले की, इतर सर्व पद्धती आतापर्यंत अयशस्वी झाल्या आहेत आणि सध्या दुसरा कोणताही मार्ग नाही.

पाहा व्हिडिओ -

पाकिस्तानातील अलाई तालुक्यातील ही घटना आहे. एक नदी पार करण्यासाठी इथे बांधण्यात आलेली केबल कार ही मंगळवारी सकाळी दुर्घटना ग्रस्त झाली होती. ज्यामध्ये 6 शाळकरी मुले आणि 2 शिक्षक उपस्थित होते. या केबल कारची वायर तुटल्यामुळे हा अपघात झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार ही केबल वायर जुनी झाली होती तसेच दररोज 150 पेक्षा अधिक मुले ही शाळेत जाण्यासाठी ही या केबल कारचा वापर हा करत असे.