टर्की (Turkey) मध्ये भूकंपामध्ये (Earthquake) बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पण अशात एका 6 वर्षीय चिमुकलीला चमत्कारितरित्या वाचवलं असल्याची माहिती समोर आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे ही कामगिरी भारतीय एनडीआरएफच्या श्वानपथकाने (Sniffer dogs of NDRF) केली आहे. Romeo आणि Julie यांनी हे काम केले आहे. जिथे मशिन यंत्रणा काम करू शकल्या नाहीत तेथे या श्वानपथकाने चिमुकली पर्यंत पोहचण्याची किमया साधली आहे. मातीच्या ढिगार्याखालून या 6 वर्षीय मुलीला वाचवणं श्वानपथकाशिवाय शक्य नव्हतं.
टर्की मध्ये भूकंपानंतर भयावह स्थिती आहे. Nurdagiआणि आजुबाजूच्या भागात आता बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. भारताचं देखील 101 जणांचं एनडीआरएफ जवान पथक ऑपरेशन दोस्ती अंतर्गत काम करत आहे. नक्की वाचा: Turkiye-Syria Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तुर्कस्तानमध्ये भूकंपाच्या 128 तासांनंतर नवजात बालकाला ढिगाऱ्याखालून सुखरूप काढण्यात आलं, Watch Video .
पहा ट्वीट
#TurkeyEarthquake | Sniffer dogs of NDRF, Julie and Romeo saved a six-year-old girl who was trapped under the debris at the earthquake-hit Nurdağı. pic.twitter.com/HCVv6wcibf
— ANI (@ANI) February 13, 2023
श्वानपथकाला हाताळणार्या कॉन्स्टेबल कुंदन यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, Nurdagi भागात बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार इथे मातीच्या ढिगार्याखाली कुणी जीवंत असल्याचा शोध घेण्यासाठी श्वानपथकातून जुली खाली गेली. तेथे जाऊन तिने भूंकण्यास सुरूवात केली. हा संकेत होता खाली कुणीतरी जीवंत आहे. ही माहिती पक्की करून घेण्यासाठी रोमिओ ला देखील पाठवण्यात आले. तो देखील भुंकला. त्यानंतर 6 वर्षीय मुलगी Beren ला वाचवण्यात आलं.
6 फेब्रुवारीला 7.8 रिश्टल स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर टर्कीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. वित्तीय हानी सोबतच 34 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेला आहे.