उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-un) एका महिन्याहून गायब होता. हुकुमशाह गेले अनेक दिवस सार्वजनिक ठिकाणी दिसलेला नाही. याधीही किम जॉन अनेकवेळा असा अनेकवेळा गायब झाला आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी तो गेल्या 7 वर्षांत सर्वात जास्त काळ गायब राहिला. अशाप्रकारे, पुन्हा एकदा हुकूमशहा आजारी पडल्याची अफवा तीव्र झाली आहे. 2014 नंतर सर्वात जास्त काळ किम बेपत्ता होण्याचे हे प्रकरण आहे. सार्वजनिक ठिकाणी न दिसण्यासोबतच किमने या काळात स्वतःला सरकारी बाबींपासून दूर ठेवले होते. सहा आठवड्यांच्या अनुपस्थितीनंतर, तो चालण्याची काठी घेऊन लोकांमध्ये पुन्हा परतला.
देशाच्या सरकारी मीडियानुसार, किम जोंग यांना शेवटचे 12 ऑक्टोबर रोजी पाहिले गेले होते. एक दिवस आधी तो राजधानी प्योंगयांगमध्ये क्षेपणास्त्र प्रदर्शनात उपस्थित होता. मात्र, त्यानंतर किमच्या दिसण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत किम उत्तर कोरियामध्ये कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेला नाही. वॉशिंग्टनच्या वॉचडॉग वेबसाइट एनके न्यूजनुसार, उपग्रह प्रतिमांनी देशाच्या पूर्व किनार्यावरील किमच्या घराभोवती आणि प्योंगयांगमधील तलावाच्या कडेला असलेल्या घराभोवती हालचालींची तीव्रता दर्शविली आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, हुकूमशहा आजारी पडल्यावर या घरांमध्येच आपला जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असे. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात, किमच्या वॉन्सन बीचच्या घराजवळील तलावात एक बोट फिरताना दिसली. परंतु, सार्वजनिकरित्या उपस्थित नसतानाही, किमने काम सुरू ठेवले आहे आणि या कालावधीत इतर राष्ट्रप्रमुखांना पत्रे लिहिली आहेत, असे राज्य माध्यमांनी वृत्त दिले आहे. उत्तर कोरियाचे सैन्य लष्करी कारवायांमध्ये अतिशय व्यस्त असताना किम गायब झाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन करत उत्तर कोरियानेही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. (हेही वाचा: 'मुलांनी आणि पुरुष शिक्षकांनी स्कर्ट घालून शाळेत यावे'; मुख्याध्यापकांनी काढले फर्मान, जाणून घ्या कारण)
या घटनेनंतर हुकुमशाहने विश्लेषक आणि गुप्तचर संस्थांचे लक्ष वेधून घेतले आहे. किम जोन्ग-उन याने जानेवारीपासून कमीतकमी दोन आठवड्यांचे आठ ब्रेक घेतले आहेत. पुढील महिन्यात उत्तर कोरियाचा शासक म्हणून तो दहा वर्षे पूर्ण करणार आहे. असे मानले जात आहे की, जर किम जोंग गंभीर आजारी नसतील, तर पुढील महिन्यात किमला सार्वजनिकपणे हजेरी लावावी लागण्याची शक्यता आहे. तसेच त्यांचे वडील किम जोंग-इल यांच्या पुण्यतिथीला 17 डिसेंबर रोजी त्यांच्या समाधीला वार्षिक भेट देण्याची अपेक्षा आहे.