उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong-Un) यांची प्रकृती बिघडली असून, ती चिंताजनक आहे. किम जोंग उन कोमात (Kim Jong-Un In Coma) गेले आहेत. किम जोंग उन यांच्या निधनाबद्दल सोशल मीडिया आणि अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. मात्र, अल्पावधीतच हे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे पुढे आले. दरम्यान, किम जोंग उन यांनी आपल्या पदाचे आणि देशाच्या नेतृत्वाचे सर्वाधिकार त्यांची बहिण किम यो जोंग (Kim Yo-jong ) हिच्याकडे सोपवल्याचे वृत्त आहे.
दक्षिण कोरीयातील काही प्रसारमाध्यमांनी किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग प्रतिक्राय दिली आहे. यात किम यो जोंग यांनी म्हटले आहे की, 'मला ते कोमात असल्याचे माहिती आहे. मी जमसू शकते. पण, त्यांचे आयुष्य संपले नाही. त्यांच्या आरोग्याबद्दल जाहीर पणे सांगितले जात आहे. कारण, फार काळ अशी गोष्ट लपवून ठेवता येणार नाही.'
उत्तर कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम डे जुंग यांच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृतात म्हटले आहे की, किम जोंग उन हे जीवंत आहेत आणि ते कोमात आहेत. पहिल्यांदा अनेक वृत्तपत्रांनी दावा करत म्हटले होते की, शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या काही चुकांमुळे किम जोंग यांची प्रकृती पूर्णपणे बिघडली. त्यांचा आजार अधिकच वाढला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका फर्टिलाइजर प्लांट उद्घाटनात किम जोंग यांचे दर्शन घडले होते. त्यानंतर ते जाहीरपणे कधीच पुढे आले नाहीत.