New York: महिला सहकाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी 70 वर्षीय भारतीय व्यक्ती दोषी
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

युनायटेड स्टेट्समधील (United States) एका 70 वर्षीय भारतीय वंशाच्या नागरिकाला त्याच्या एका महिला कर्मचाऱ्याला जबरदस्तीने काम आणि लैंगिक कृत्ये (Sexual Acts) करण्यास भाग पाडणे यासह अनेक आरोपांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. यूएसच्या न्याय विभागाने याबाबत निवेदन जारी केले आहे. श्रीश तिवारी असे या व्यक्तीचे नाव आहे. जो अमेरिकेचा कायदेशीर स्थायी रहिवासी आहे. श्रीश हा जॉर्जियाच्या कार्टर्सव्हिल येथे मोटेलचे व्यवस्थापन करत होता. त्याने पीडितेला मोटेलमध्ये हाऊस क्लिनर म्हणून कामावर ठेवले होते. श्रीश तिवारी याला माहिती होते की, पीडिता बेघर आहे. तसेच ती हेरॉईनच्या व्यसनाच्या आहारी गेली होती आणि त्यातून ती नुकतीच बाहेर पडली होती. तिच्यात आणि पतीमध्ये वाद होता. त्यातून न्यायालयातील खटल्यात तिने आपल्या मुलावरील ताबा गमावला होता. त्याताच फायदा तिवारीने घेतला.

युएसच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तिवारीने पीडितेला वचन दिले होते की, तो तिला तिच्या मुलाचा ताबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच, तिला पगार, एक अपार्टमेंट आणि एक वकील देऊन मदत करेल. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी श्रीश तिवारी याने पीडितेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याने पीडितेला इतरांशी बोलण्यास मज्जाव केला. तिच्यावर त्याने अनेक बंधने घातली. इतकेच नव्हे तर पीडितेच्या असहायतेचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर लैंगीक बळजबरी केली. पीडितेने त्यास विरोध केला. मात्र, तिवारीने तिला धमकी दिली की, अंमली पदार्थ वापरल्याबद्दल कायद्याची अंमलबजावणी किंवा बाल कल्याण एजन्सीकडे तिची तो तक्रार करेल. (हेही वाचा, Sex Championship: स्वीडनमध्ये सेक्सला 'खेळ' म्हणून मान्यता; 8 जूनला होणार पहिली युरोपियन 'सेक्स चॅम्पियनशिप', Massage, Oral Sex, Penetration सह 16 विषयांचा समावेश)

पुढे तिवारीने पीडितेवरील अत्याचार वाढवले. कधी जबरी संभोग, कधी मुखमैतून करण्याची त्याने तिच्याकडे मागणी केली. पुढे त्याने तिला घरातून हाकलून दिले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिवारी याला 6 सप्टेंबर रोजी दोषी ठरविण्यात आले. या प्रकरणात तिवारीला जास्तीत जास्त 20 वर्षांचा तुरुंगवास किंवा USD 250,000 दंडाची शिक्षा होऊ शकते. फेडरल न्यायाधीश यूएस शिक्षेची मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर वैधानिक घटकांवर आधारित कोणतीही शिक्षा निश्चित करेल.