नेपाळ मध्ये गोळीबार, सात भारतीयांना अटक
Arrest | Representational Image | Photo Credits: File Photo

काठमांडू: गुरुवारी नेपाळ (Nepal) मध्ये एका मंदिराजवळ पोलिसांवर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली सात भारतीय तरुणांना अटक करण्यात आली आहे. हे तरुण बिहार (Bihar) च्या समस्तीपूर (Samastipur) विभागाचे मूळ रहिवाशी असल्याचे पोलिसांच्या माहितीनुसार समोर येत आहे. यापैकी रवी मलिक (Ravi Malik)  या तरुणाला पोलिसांनी चालवलेली बंदुकीची गोळी लागली होती पण आता त्याचे स्थिती स्थिर आहे.

भारत-नेपाळ सीमेवर पेट्रोल-डिझेलची तस्करी ; बिहारच्या 'या' शहरात पेट्रोलची किंमत फक्त 69 रुपये

नेपाळमध्ये झालेल्या या प्रसंगाच्या नंतर हे तरुण पुन्हा बिहारमध्ये आले होते. मात्र जनकपूर येथील बिहार कुंड मंदिरात दरोडा घालण्याच्या हेतूने आलेल्या या आरोपीना आता अटक करण्यात आली आहेसूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी या आरोपीनकडून दोन बंदूक, दोन बुलेट्स, एक चाकू, एक मासिक आणि दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.