मुंबईमध्ये काल (11 जुलै) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना सुरू झाली आहे. दरम्यान त्यांच्यावर मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षावदेखील झाला आहे. यामध्येच आता नेपाळचे पंतप्रधान KP Sharma Oli यांनी देखील बच्चन कुटुंबाच्या कोविड 19 विरूद्धच्या लढाईसाठी शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावी आणि चांगलं आरोग्य रहावे अशा कामना करण्यात आली आहे.
दरम्यान अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्यावर कालपासून नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान या दोघांच्या पाठोपाठ ऐश्वर्या राय बच्चन आणि लेक आराध्या बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट्स देखील पॉझिटीव्ह आले आहेत. अमियाभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांचे रिपोर्ट्स मात्र निगेटीव्ह आहेत. तसेच श्वेता नंदा आणि तिच्या मुलांचेही रिपोर्ट्स निगेटीव्ह आले आहेत. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांना कोविड 19 वर मात करण्यासाठी लता मंगेशकर, माधुरी दीक्षित ते सचिन तेंडुलकर पर्यंत मान्यवरांच्या शुभेच्छा!
Wishing legendary actor of India Amitabh Bachchan and his son actor Abhishek Bachchan good health and speedy recovery: Nepal Prime Minister KP Sharma Oli (file photos) pic.twitter.com/ir0w0XIwTd
— ANI (@ANI) July 12, 2020
आज प्रशासनाच्या नियमावलीनुसार, कोरोनाबाधितांचे निवासस्थान सॅनिटाईज करून कॉन्टक्ट ट्रेसिंगच्या कामासाठी मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी पोहचले. बीएमसीकडून बिग बींचा 'जलसा' बंगला परिसरात निर्जतुकीकरण करण्यात आले असून त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर containment zone चा बॅनर लावण्यात आला आहे.