अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांना कोविड 19 वर मात करण्यासाठी लता मंगेशकर, माधुरी दीक्षित ते सचिन तेंडुलकर पर्यंत मान्यवरांच्या शुभेच्छा!
अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा अ‍ॅंग्री यंग मॅन अशी ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचा आता कोरोना व्हायरस विरूद्ध लढा सुरू झाला आहे. काल अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना जुहूच्या नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिग बी आणि अभिषेक बच्चन यांना ताप, खोकला अशी सौम्य लक्षणं आहेत. दरम्यान ते डॉक्टरांच्या निगराणीखाली असून आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून लवकरच कोविड 19 वर ते मात करतील असा विश्वास आहे.

अभिषेक बच्चन याने रात्री ट्वीट करत आम्ही सुरक्षित असून पॅनिक होऊ नका असा मेसेज ट्वीट केला आहे. त्यानंतर बच्चन कुटुंबीयावर अमिताभ आणि अभिषेकच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशभरात प्रार्थना सुरू झाली आहे. सेलिब्रिटींमध्ये लता मंगेशकर, माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर ते अगदी खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत अनेक मान्यावरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लता मंगेशकर

माधुरी दीक्षित

सचिन तेंडुलकर

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

दरम्यान बच्चन कुटुंबामध्ये जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. आज पालिकेकडून जुहू येथील जलसा बंगला सॅनिटाईझ करण्याचं काम सुरू आहे. तसेच पालिकेने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर कंटेन्मेंट झोन असा बॅनर लावला आहे.

अमिताभ बच्चन यांनी  त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोविड चाचणी त्यांनी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.