Photo Credit - X

Nepal Landslide: नेपाळमध्ये शुक्रवारी 12 जुलै रोजी पहाटे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन(Nepal Landslide)झाले. या दुर्घटनेत सात जणांना(Indian Nationals)आपला जीव गमवावा लागला. सरकारी प्रशासक खिमा नंदा भुसाळ यांनी सांगितले की, मृतदेहांची ओळख पटली असून नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे. मृतांमध्ये तीन भारतीय असून उर्वरित चार नेपाळी नागरिक आहेत. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. भूस्खलनाच्या ढिगाऱ्यांमुळे नारायणघाट-मुगलिंग मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. (हेही वाचा:Nigeria School Collapse: दुमजली शाळा कोसळल्याने अनेक विद्यार्थी ठार, 100 हून अधिक अडकले )

पोस्ट पहा

वाहून गेलेल्या बसमध्ये 65 प्रवासी होते. त्यापैकी अनेक जण आता बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मायरिपब्लिका या नेपाळी न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, शोध आणि बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. सात मृत भारतीयांना घेऊन जाणारी एक बस बीरगंजहून काठमांडूला जात होती. तिसुद्धा पाण्याच्या प्रवाहात ओढळी गेल्याने सातही जणांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे रस्ते विभागाने 15 दिवसांपासून नारायणघाट-काठमांडू रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे वाहतूक तात्पुरती पूर्ववत करण्यात आली होती. तोच धोका पत्करणे अंगाशी आले आणि बसवर दरड कोसळली.