National Geographic | (File Image)

National Geographic Lays Off: विज्ञान, निसर्ग आणि भौगोलिक प्रदेश यांसारख्या वैविध्यपूर्ण विश्वाचा सखोल विचार करुन विस्तृत माहिती, लेख आणि वृत्त प्रसारीत करण्यासाठी ओळखले जाणारे नॅशनल जिओग्राफिक (National Geographic) हे मासिक शेवटच्या घटका मोजत आहे. हे मासिक बंद होईल असे बोलले जात आहे. मासिकाने टाळेबंदी जाहीर केली आहे. टाळेबंदीच्या नावाखाली शेवटी काही उरलेले कर्मचारी आणि लेखकांनाही नोकवरीवरुन काढण्यात आले आहे.

नॅशनल जिओग्राफिक मासिक पाठिमागील काही काळापासून मुद्रीत अंकाचा खप, त्यात सातत्याने होणारी घट आणि डिजिटल माध्यमाचा वाढलेल्या अवकाष यांमध्ये टिकून राहण्यासाठी संघर्ष करत होते. त्यामुळे मासिकाने वारंवार टाळेबंदी जाहीर केली. मासिकाने शेवटची केलेली टाळेबंदी ही 2015 पासून सुरु केलेही ही चौथी आणि पाठिमागील नऊ महिन्यातील दुसरी टाळेबंदी होती. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, हे मासिक आता डिजिटल अवृत्तीवर अधिक भर देईल. त्यासाठी ते फ्रीलांसरशी संपर्क साधेल किंवा संपादकीय कर्मचार्‍यांकडून लेख घेऊन प्रकाशित केले जाईल. मासिकाने नुकतेच आपल्या 19 कर्मचारी लेखक यांना काढण्यात आले.

नॅशनल जिओग्राफिक ही एक प्रसिद्ध अमेरिकन मीडिया संस्था आहे. जी शोध, विज्ञान, निसर्ग आणि संस्कृती यावर लक्ष केंद्रित करते. संस्थेची स्थापना 1888 मध्ये झाली होती. तेव्हापासून ते जगाविषयी आणि त्याच्या विविध चमत्कारांबद्दल माहितीचे प्रमुख स्त्रोत बनले. नॅशनल जिओग्राफिक मासिके, दूरचित्रवाणी चॅनेल, वेबसाइट आणि इतर मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विस्तृत विषयांचा समावेश करते. संस्थेचे दूरदर्शन चॅनेल, जसे की नॅशनल जिओग्राफिक चॅनल आणि नॅट जिओ वाइल्ड, वैशिष्ट्यपूर्ण माहितीपट आणि मालिका ज्यामध्ये नैसर्गिक जगाचे विविध पैलू, वैज्ञानिक शोध, सांस्कृतिक घटना आणि जगभरातील मानवी कथा यांचा समावेश होतो.

गेल्या काही वर्षांमध्ये, नॅशनल जिओग्राफिकने अनेक महत्त्वाच्या मोहिमा आणि वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. त्याचे शोधक आणि छायाचित्रकार विविध परिसंस्था, लुप्तप्राय प्रजाती आणि स्वदेशी संस्कृतींचे दस्तऐवजीकरण करून जगाच्या दुर्गम कोपऱ्यात गेले आहेत. ही संस्था संवर्धन आणि पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित वृत्ती दर्शवली आहे.