Sunita Williams | (Photo Credit- X)

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) तैनात असलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी अमेरिका आणि जगभरातील समुदायांना दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali Wishes) दिल्या आहेत. विशेष उल्लेखनीय असे की, या शुभेच्छा त्यांनी आंतराळातून पृथ्वीपासून 260 मैल उंचीवरून आलेल्या एका व्हिडिओ संदेशाद्वारे दिल्या आहेत. विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत. आपल्या संदेशाद्वारे त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सांस्कृतिक वारशाप्रती असलेल्या समर्पणाच्या आठवणी सामायिक केल्या आहेत. तसेच त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी (White House Diwali 2024) केल्याबद्दल कृतज्ञता सुद्दा व्यक्त केली.

जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभार

सुनिता विल्यम्सने आपल्या इंग्रजी संदेशात ज्याचा भावार्थ पुढे दिला आहे. ज्यात म्हटले आहे की, 'आयएसएसकडून शुभेच्छा. "आज व्हाईट हाऊसमध्ये आणि जगभरात दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! माझ्या वडिलांनी आम्हाला दिवाळी आणि इतर भारतीय सणांबद्दल शिकवून त्यांची सांस्कृतिक खोलवर रुजवली आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार. दिवाळी हा आनंदाचा काळ आहे कारण जगात चांगुलपणा आहे. दरम्यान, त्यांनी भारतीय-अमेरिकन समुदायासह दिवाळी साजरी केल्याबद्दल U.S. अध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभार मानले. आमच्या समुदायासोबत दिवाळी साजरी केल्याबद्दल आणि आमच्या समुदायाच्या अनेक योगदानांना मान्यता दिल्याबद्दल राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे आभार", असे त्या म्हणाल्या. हा संदेश व्हाईट हाऊसच्या दिवाळी उत्सवाचा एक भाग होता, ज्याने अमेरिकेत या सणाची वाढती मान्यता अधोरेखित केली. (हेही वाचा, Dhanteras 2024 Shopping Do's and Don'ts: जाणून घ्या धनत्रयोदशीला कोणत्या गोष्टींची करावी खरेदी व कोणत्या गोष्टी टाळाव्या)

पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये परतीची अपेक्षा

सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विलमोर जूनपासून आयएसएसवर आहेत. त्यांनी 5 जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानातून त्याच्या पहिल्या क्रू मिशनवर प्रवास केला आणि एका दिवसानंतर आय. एस. एस. वर पोहोचले. विल्यम्स आणि विल्मोर यांनी आय. एस. एस. वर त्यांचे काम सुरू ठेवले आहे, जे आता पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये परत येण्याची अपेक्षा आहे.  (हेही वाचा, US Presidential Election 2024: Sunita Williams आणि Butch Wilmore 2024 च्या यूएस राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये अंतराळातूनच मतदान करणार (Watch Video))

सुनीता विल्यम्स, ज्यांना सुनी विल्यम्स म्हणूनही ओळखले जाते. त्या एक प्रतिष्ठित NASA अंतराळवीर आणि यूएस नेव्हीच्या निवृत्त कॅप्टन आहेत. 19 सप्टेंबर 1965 रोजी युक्लिड, ओहायो येथे जन्मलेल्या तिची अंतराळ संशोधनात प्रभावी कारकीर्द आहे. सुनीता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर दोन दीर्घ कालावधीच्या मोहिमेवर आहेत. तिने एक्सपिडिशन 14/15 वर फ्लाइट इंजिनीअर आणि नंतर एक्सपिडिशन 32/33 वर कमांडर म्हणून काम केले. 50 तास आणि 40 मिनिटांच्या एकूण सात स्पेसवॉकसह एका महिलेने सर्वाधिक स्पेसवॉक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 2024 मध्ये, मोहीम 71/72 क्रूचा एक भाग म्हणून त्या बोईंगच्यास्टारलाइनर अंतराळ यानात ISS वर पोहोचल्या आहेत. स्टारलाइनरच्या प्रोपल्शन सिस्टम 3 मधील समस्यांमुळे त्यांचे पृथ्वीवर परत येण्यास फेब्रुवारी 2025 पर्यंत विलंब झाला आहे.