Amrapali Gan (photo Credits: Instagram)

भारतीय महिला अतिशय वेगाने प्रगतीच्या शिड्या चढत आहेत. यावर्षी अनेक भारतीय महिलांनी आपल्या कौशल्याने देशाचे नाव जगभरात ‘रोशन’ केले. हरनाज कौर संधूने अलीकडेच मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला, तर लीना नायर यांनी एका मोठ्या फॅशन ब्रँड चॅनलच्या सीईओपदी विराजमान होऊन एक उदाहरण देशासमोर ठेवले. आता वर्षअखेरीस मुंबईत राहणाऱ्या आम्रपाली (एमी) ​​गननेही (Amrapali Gan) काही अशीच कामगिरी केली आहे. मुंबईत जन्मलेली 36 वर्षीय आम्रपाली गुन, OnlyFans अडल्ट कंटेंट प्लॅटफॉर्मची सीईओ बनली आहे.

ओन्लीफॅन्सचे माजी संस्थापक टिम स्टोकली (38) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्रपाली यांना पदभार सोपवण्यात आला आहे. 2016 मध्ये टिमने OnlyFans ची स्थापना केली होती, त्यानंतर तो 5 वर्षांपासून या पदावर आहे. नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याआधी सुट्टीचा आनंद घ्यायचा असल्याने तो हे पद सोडत असल्याचे त्याने सांगितले. आम्रपाली यांच्याकडे सीईओ पद सोपवताना टिमने सांगितले की, ती खूप चांगली सहकारी तसेच माझी एक चांगली मैत्रिण आहे. मी एका मैत्रिणीला आणि सहकाऱ्याला कमांड सोपवत आहे. तिच्याकडे संस्थेला एका ठराविक उंचीवर घेऊन जाण्यासाठी दृष्टी आणि क्षमता आहे.

आम्रपालीने यापूर्वी रेड बुल आणि क्वेस्ट न्यूट्रिशनसाठी काम केले आहे. 2020 मध्ये ती ओन्लीफॅन्स कंपनीशी चीफ मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून जोडली गेली होती. आता कंपनीची सीईओ झाल्यानंतर आम्रपाली म्हणते, ‘या सन्मानाबद्दल मी कंपनीचे आभार मानते. मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडेन. मला खूप अभिमान आणि आनंद आहे की कंपनीने माझ्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.’ (हेही वाचा: काय सांगता? स्वतःची 'पाद' विकून टीव्ही स्टारने आठवड्याला कमावते 37 लाख रुपये; काचेच्या बाटलीत भरून ऑनलाईन विकते Fart)

दरम्यान, OnlyFans हे 2016 मध्ये तयार केलेला एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप आहे जिथे लोक मासिक सदस्यत्वाद्वारे फोटो आणि व्हिडिओ असा कंटेंट पाहू शकतात. OnlyFans वर फक्त अडल्ट कंटेंट नाही तर, याठिकाणी तुम्हाला आरोग्य आणि फिटनेस टिप्स, नृत्य, लेखक, कलाकार, संगीतकार, शेफ यांच्याशी निगडीत कंटेंट पाहायला मिळेल.