काय सांगता? स्वतःची 'पाद' विकून टीव्ही स्टारने आठवड्याला कमावते 37 लाख रुपये; काचेच्या बाटलीत भरून ऑनलाईन विकते Fart (Watch Video)
Stephanie Matto (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगात असे अनेक चित्रविचित्र व्यवसाय आहेत ज्याद्वारे लोक लाखो रुपये कामावत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही परंतु हे लोक पैसे कमावण्यासाठी अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतात. सध्या अशाच विचित्र मार्गाने पैसे कमावणारी एक महिला खूप चर्चेत आहे. अमेरिकेची रिअॅलिटी टीव्ही स्टार स्टेफनी मॅटो (Stephanie Matto) ही चक्क तिची पाद (Fart) विकून पैसे कमावत आहे. होय ऐकायला थोडे विचित्र वाटत असेल मात्र हे खरे आहे. स्टेफनी तिच्या फार्ट ऑनलाइन विकते आणि या कामातून तिला लाखो रुपयेही मिळतात. याबाबतचा खुलासा तिने स्वतः आपल्या व्हिडिओमध्ये केला आहे.

अमेरिकन रिअॅलिटी शो '90 डे फियान्से' (90 Day Fiancé) मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली स्टेफनी मॅटो टीव्हीवर जितकी कमाई करू शकली नाही, त्यापेक्षा जास्त कमाई ती तिच्या पाद विकण्याच्या व्यवसायातून करत आहे. स्टेफनी काचेच्या बाटलीमधून तिच्या पाद ऑनलाइन अनोळखी लोकांना विकते. स्टेफनीने इन्स्टाग्रामवरील तिच्या एका व्हिडिओमध्ये पाद विकण्याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Stephanie Matto (@stepankamatto)

चांगल्या गॅससाठी ती तिच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष देते. ती नाश्त्यात बीन्स, प्रोटीन मफिन्स, उकडलेली अंडी, प्रोटीन शेक आणि दही खाते. यानंतर, जेव्हा गॅस तयार होऊ लागतो तेव्हा तो ती एका छोट्या काचेच्या बाटलीत भरते. या बाटलीत आधीपासूनच ती फुलांच्या पाकळ्या घालून ठेवते, अशा प्रकारे, गॅसचा वासाची तीव्रता कमी करता येते. एक लहान काचेची बाटली ती एक लाख रुपयांपर्यंत विकते. (हेही वाचा: युगांडा: असा सोडतो वास, पटकण मरतो डास; पादणाऱ्या व्यक्तीशी कंपनीने केला करार, होणार संशोधन)

 

View this post on Instagram

 

A post shared by Stephanie Matto (@stepankamatto)

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्टेफनीने सांगितले आहे की, अनेक वेळा ती एका आठवड्यात 37 लाख रुपये कमावते. इतरांच्या पादाचा वास घेणारे किंवा तशी आवड असणारे बरेच लोक आहेत. स्टेफनीच्या ग्राहकांनी तिच्याकडे तिचे अंडरगारमेंट्सची मागणीही केली आहे.