अमेरिकेतील मिसुरी येथे एका महिलेला तिच्या जुळ्या मुलांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या महिलेने आधी सांगितले होते की, तिची मुले मृत जन्माला आली होती. मात्र तपासामध्ये तिनेच आपल्या मुलांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. माया कॅस्टन (Maya Caston) असे या आईचे नाव असून ती 28 वर्षांची आहे. मायाला न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले. मायाने या नवजात मुलांना मुद्दाम काही दिवस उपाशी ठेवले, ज्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला.
सेंट लुईस पोस्ट-डिस्पॅचच्या अहवालानुसार, ज्युरीने मायाला या हत्येसाठी (सेकंड डिग्री) दोषी ठरवण्यापेक्षा कमी गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले. सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, मुलांची काळजी घेण्यात मायाने निष्काळजीपणा केल्याने ती त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली.
मुलांच्या जन्मापूर्वी, तिने इंटरनेटवर गर्भपात आणि गर्भपाताच्या पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर शोध घेतला होता, ज्यावरून असे दिसून आले की तिला ही मुले नको होती. मायाने ज्युरीला असेही सांगितले की, तिने बाळांना जन्म दिल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना दत्तक देण्यासाठी देण्याची योजना आखली होती, परंतु त्यापूर्वीच बाळांचा मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे मायाने, ‘तुम्ही बाळाला घरामागच्या बागेत पुरू शकता का?’ असेही इंटरनेटवर सर्च केले होते.
माहितीनुसार, मायाने लहान मुलांचे तोंड आणि नाक टॉवेल आणि ब्लँकेटने झाकले होते. त्यांना तिने लपवले होते. मुलांना तिने कोणतीही वैद्यकीय मदत पुरवली नाही. तसेच मायाने या मुलांना काही खायला दिले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. मायाने कोर्टात सांगितले की, ती धक्क्यात होती. मुलांचे काय करावे हे तिला कळत नव्हते. (हेही वाचा: Female Teacher Raped Student: शिक्षिकेने केला 16 वर्षांच्या विद्यार्थ्यावर बलात्कार; दाखवले चांगल्या मार्कांचे आमिष)
सहायक फिर्यादी वकील थॉमस डिटमेयर यांनी सांगितले की, त्यांना दोन मृत मुले सापडली आहेत. त्यांची आई मायाला ही मुले नको होती. तिला त्यांची पर्वा नव्हती. तिने त्यांची नावेही ठेवली नव्हती. दुसरीकडे, मायाच्या वकिलांनी सांगितले की ती, सारासार विचार करू शकत नाही आणि बाळाच्या जीवाला असलेल्या धोक्याची तिला कल्पना नव्हती.