Mohamed Al-Fayed Passes Away: अब्जाधीश मोहम्मद अल-फयाद यांचे निधन, अनेकांना आठवला Princess Diana यांचा मृत्यू
Mohamed Al-Fayed | (Photo Credit - Twitter))

इजिप्शियन अब्जाधीश (Egyptian billionaire) मोहम्मद अल-फयाद ( Mohamed al-Fayed) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे अनेकांना त्यांच्या मुलाचा आणि आणि राजकुमारी डायना (Princess Diana) यांच्या मृत्यूची आठवण आली आहे. त्याचे कारण असे की, डायना यांच्यासोबत त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता. इजिप्शियन शहरात अलेक्झांड्रियामध्ये जन्मलेल्या, अल-फयाद यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात फिजी ड्रिंक्स विकण्यापासून केली आणि नंतर शिलाई मशीन सेल्समन म्हणून काम केले. त्यांनी प्रथम मध्य पूर्व आणि नंतर युरोपमध्ये रिअल इस्टेट, शिपिंग आणि बांधकाम क्षेत्रात उद्योग व्यवसाय निरमाण केला आणि पुढे आपल्या कुटुंबाची संपत्ती निर्माण केली.

पॅरिसमधील हॅरॉड्स, फुलहॅम आणि रिट्झ हॉटेल यांसारखी प्रतिष्ठान सिंबॉल अल-फयदच्या मालकीची असली तरी, तो ब्रिटनमध्ये नेहमीच बाहेरचा माणूस राहिले. ब्रिटीशांनी त्याला निवास दिला, सहन केले पण स्वीकारले नाही. अनेक दशकांपासून त्याचे घर असलेल्या देशाचे नागरिकत्व देण्यास ब्रिटीश सरकारने नकार दिल्याने आणि अनेकदा फ्रान्सला जाण्याची धमकी दिल्याने ते ब्रिटिश सरकारच्या विरोधात राहीला. नंतर त्यांना लीजन ऑफ ऑनर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

मोहम्मद अल-फयाद हे एक आक्रमक आणि स्पष्टवक्ते उद्योजक होते. राजकुमारी डायना आणि त्यांचा मुलगा डोडी यांची हत्याच झाली असा त्यांचा दावा होता. त्यामुळे आपला आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी डायनाच्या मुत्यूचे गुढ उकलण्यासाठी त्यानी जवळपास 10 वर्षे न्यायालयीन लढाई लढली. त्यांनी ब्रिटीश राजघराण्यावरही डायना प्रकरणात गंभीर आरोप केले. डायना यांचा मृत्यू पापाराझींपासून बचव करताना झालेल्या अपघातात झाला होता.