Princess Diana Jewelry: रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन (Kim Kardashian) आता अटाल्लाह क्रॉस (Attallah Cross) ची नवीन मालक बनली आहे. हा क्रॉस एकेकाळी राजकुमारी डायनाचा (Princess Diana) होता. दिवंगत राजकुमारी अनेक प्रसंगी ते परिधान करताना दिसली होती. हा क्रॉस मूळतः 1920 च्या दशकात गार्ड या ब्रिटिश ज्वेलरने बनवला होता. याचा लिलाव सोथबीज या लिलावगृहाने केला होता.
सोथेबीच्या म्हणण्यानुसार, लंडनमधील विक्रीत दागिन्यांची वस्तू 163,800 पौंड (सुमारे 6 कोटी ) मध्ये विकला गेला. चार बोलीदारांनी पेंडेंटसाठी स्पर्धा केली जी अखेरीस किम कार्दशियनकडे गेली. (हेही वाचा - Met Gala 2022: मेट गालामध्ये Kim Kardashian ने परिधान केला 38 कोटींचा ड्रेस; तीन आठवड्यांत 7 किलो वजन घटवले (See Photos))
सोथबीच्या ख्रिश्चन स्पॉफॉर्थने सांगितले की, 'दिवंगत राजकुमारी डायनाच्या मालकीचे किंवा परिधान केलेले दागिने फार क्वचितच बाजारात येतात. विशेषत: यातील अट्टालाह क्रॉस हा एक खूप रंगीत, ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.'
लिलावगृहाने उघड केले की, अट्टाल्लाह क्रॉस अंदाजे किंमतीपेक्षा जवळजवळ दुप्पट किमतीला विकला गेला. प्रिन्सेस डायनाने 1987 च्या चॅरिटी इव्हेंटमध्ये हा क्रॉस घातला होता. किम कार्दशियनला जुन्या गोष्टींची आवड आहे. तत्पूर्वी, मेट गालामध्ये ती मर्लिन मनरोचा 1962 चा ड्रेस परिधान करून पोहोचली होती.
अट्टाल्लाह क्रॉस हे ठळक आणि रंगीबेरंगी पेंडेंट आहे आणि ते चौकोनी नीलमणी आणि गोलाकार-कट हिऱ्याने सेट केलेले आहे. असे म्हटले जाते की पेंडेंटमधील हिऱ्याचे वजन सुमारे 5.25 कॅरेट आहे.