Kim Kardashian (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील सर्वात लोकप्रिय फॅशन इव्हेंट ‘मेट गाला 2022’ (Met Gala 2022), 2 मे रोजी न्यूयॉर्कमध्ये सुरू झाला. फॅशनच्या या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये, 2 मेच्या संध्याकाळी अनेक स्टार्सनी हजेरी लावली. यावेळी हॉलिवूड सेलिब्रिटी एकापेक्षा एक अशा उत्तम आउटफिटमध्ये दिसले. जगातील कानाकोपऱ्यातून चित्रपटसृष्टीतील तारे आणि फॅशन दिग्गज या फॅशन इव्हेंटमध्ये सामील होत आहेत. यावेळी अभिनेत्री किम कार्दशियनवर (Kim Kardashian) सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. किम तिचा बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत मेट गाला 2022 मध्ये पोहोचली. यावेळी किमच्या ग्लॅमरपेक्षा तिचे वजन कमी झाल्याची जास्त चर्चा होती.

किमने या फॅशन इव्हेंटमध्ये एक खास ड्रेस परिधान करण्यासाठी आपले वजन कमी केले आहे. तिने यंदाच्या मेट गालामध्ये मर्लिन मनरोचा (Marilyn Monroe) आयकॉनिक लूक रिक्रिएट केला. यासाठी तिने अवघ्या तीन आठवड्यांत 16 पौंड (सुमारे साडेसात किलो) वजन कमी केले आहे. या एकदम घट्ट अशा गाऊनमध्ये किम एकदम फिट दिसली. किमने तिच्या गाऊनसोबत पांढऱ्या रंगाचा फर कोट घातला होता. तसेच ब्लॉन्ड हेअर कलरला स्लीक बन शेप हेअरस्टाइल देण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kim Kardashian (@kimkardashian)

या ड्रेससोबत किमने 18k व्हाइट गोल्ड आणि डायमंड इअरिंग्ज कॅरी केल्या आहेत. किम कार्दशियनने या ड्रेसमधील तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून त्याची माहिती दिली आहे. तिने लिहिले की, 'मर्लिन मनरोचा हा आयकॉनिक ड्रेस परिधान करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता.’

हा आकर्षक स्किनटाइट गाऊन कॉस्टमियर जीन लुईस (Costumier Jean Louis) यांनी 6000 क्रिस्टल्सने तयार केला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, या ड्रेसची किंमत  5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 38 कोटी 33 लाख इतकी आहे. (हेही वाचा: Natasha Poonawalla चा मेट गालामध्ये साडीतील गोल्डन लूक पाहून खिळल्या सर्वांच्या नजरा; पहा नताशाचा रेड कार्पेटवरील देसी ग्लॅमर अंदाज)

दरम्यान, न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 2 मे रोजी संध्याकाळी सुरू झाला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना धूम्रपान न करण्यासोबतच लसूण आणि कांदा खाणे प्रतिबंधित आहे. याशिवाय कार्यक्रमादरम्यान सेल्फी काढण्यासही मनाई आहे. ग्लोबल आयकॉन असलेल्या लोकांनाच या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते.