Met Gala 2022: यंदा मेट गाला 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व भारतीय सोशलाईट आणि व्यावसायिक महिला नताशा पूनावाला (Natasha Poonawalla) करत आहे. उद्योजक नताशा पूनावालाने रेड कार्पेटवर धमाकेदार एंट्री केली तेव्हा तिच्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता देसी ग्लॅमर आणि अमेरिकन स्फूर्ती असलेल्या या पोशाखातील नताशा पूनावालाचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत.
देसी ग्लॅमर आणि अमेरिकन प्रेरणा असलेला हा पोशाख भारतीय डिझायनर सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukharjee) यांनी डिझाइन केला आहे. मेट गाला 2022 साठी नताशा पूनावालाचा बस्टियर टॉप शियापारेलीने डिझाइन केला होता. यामुळेच मेट गाला नाईटच्या बेस्ट ड्रेस्ड सेलिब्रिटींच्या यादीत नताशाचा समावेश झाला आहे आणि आता त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. (हेही वाचा - Virat Kohli ने पत्नी Anushka Sharma ला दिल्या रोमँटिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा; जाणून घ्या काय होती तिची प्रतिक्रिया (See Post))
सब्यसाची मुखर्जीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नताशाच्या गोल्डन लूकचे फोटो शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करताना सब्यसाचीने खुलासा केला की, मेट गालासाठी नताशा पूनावालाला भारतातील विविध संस्कृती दर्शविणारा ड्रेस हवा होता. सब्यसाचीने नताशाची दृष्टी त्याच्या कॅनव्हासवर आणली आणि नेमका तोच पोशाख तिच्यापर्यंत पोहोचवला.
View this post on Instagram
View this post on Instagram
नताशाने मेट गालामध्ये परिधाने केलेल्या आउटफिटमध्ये सब्यसाची मुखर्जीने रेशमी चमकदार नक्षी आणि सोनेरी धागे वापरले आहेत. याआधीही भारतीय अभिनेत्रींनी मेट गालामध्ये देसी तडका लावला आहे. प्रियांका चोप्राचा लूक दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. नताशाच्या या लूकची खासियत सांगून सब्यसाचीने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे लूक डीकोड केला आहे.